आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साइड इफेक्टस्: पालिका कर्मचारी बेहाल, चार कर्मचारी रुग्णालयात, उपचारासाठीही पैसे नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कर्जबाजारी महापालिकेची खाती गोठल्यामुळे िनर्माण झालेली कोंडी फुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसताना आता या कोंडीचा विपरीत परिणाम थेट कामगार-कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावरही होत आहे. दोन महिन्यांपासून दमडीही हातात पडली नसल्याने कर्मचारी बेहाल असून अनेकजण सावकाराकडे उधार उसनवारी करीत आहेत.त्यातच एका निवृत्त कर्मचाऱ्यासह चार जणांना वेगवेगळ्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान,पगार नसल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी उपायुक्तांविरोधात घोषणाबाजी करीत त्यांना पालिकेच्या दारातच अडवले.दुसरीकडे डीआरटीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाकडूनही पालिकेला अद्याप दिलासा मिळालेला नाही.

कर्मचाऱ्यांसाठीसावकारी तेजीत : दोनमहिन्यांपासून पगार-पेन्शन मिळत नसल्याने घरखर्चाच्या पैशांसाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची फरपट होत आहे. अशा परिस्थितीत सावकारी तेजीत आली असून २० ते ३० टक्के दराने पैसे दिले जात आहेत.

आंदोलकांचासंताप उपायुक्तांवर : संतप्तआंदोलकांनी उपायुक्त अविनाश गांगोडे यांचे वाहन दुपारी ४च्या सुमारास पालिकेच्या प्रवेशद्वारातच अडवले. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वातावरण प्रक्षोभक असल्याने वाहनातून खाली उतरल्यावर अनुचित प्रकार होण्याची शक्यता असल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी चर्चेसाठी कार्यालयात बोलावले होते. या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पगार आणि न्यायालयीन बाबींची कल्पना देण्यात आली.

कर्मचाऱ्याच्या पत्नीने घेतले फिनाइल
पगारहोत नसल्याने नवीन जोशी काॅलनीत राहणारा पालिकेचा कर्मचारी संतोष जोशी उधारी-उसनवारी करून पैसे घेत होता. अनेकांकडे उधारी वाढल्याने नैराश्यातून पती-पत्नीत गुरुवारी दुपारी कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्याची पत्नी ज्याेती हिने घरातील फिनाइल प्राशन केले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शुक्रवारी सायंकाळी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. या व्यतिरिक्त प्रकृती खालावल्याने तीन दविसांपासून सफाई कर्मचारी महेश रील आणि सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर सपकाळे खासगी रुणालयात उपचार घेत आहेत. खिशात पैसे नसल्याने त्यांनाही उपचारात अडचणी येत आहेत.

सहकाऱ्यांच्या पैशांवर उपचार
पालिकेच्याअतिक्रमण विभागातील कर्मचारी प्रकाश मोरे याची निवडणूक कामी िनयुक्ती झाली होती. महसूल विभागाकडे सेवा वर्ग केल्यावर या कर्मचाऱ्याला शुक्रवारी सकाळपासून तहसील कार्यालयात शौचालय गोदाम सफाईचे काम लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कामाची सवय नसल्याने छातीत दुखू लागल्याने या कर्मचाऱ्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने उपायुक्त, अतिक्रमण अधीक्षक सहकाऱ्यांनी पैसे गोळा करून दिल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान, शौचालय स्वच्छतेचे नव्हे तर मतदान साहित्य ठेवण्याच्या खोलीचे सफाईचे काम दिले असल्याचे तहसीलदार गोविंद िशंदे यांनी स्पष्ट केले आहे.

सुनावणी सोमवारवर
डीआरटीनेकेलेल्या खाती गोठवण्याच्या निर्णयाविरोधात महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. यावर शुक्रवारी सायंकाळीदेखील कामकाज होऊ शकले नाही. डीआरटी कोर्टाने सफाई कर्मचाऱ्यांच्या पगाराची आकडेवारी मागवली होती, यावरही कोणताही निर्णय झालेला नाही. आता या विषयावर डीआरटीमध्ये सोमवारी सुनावणी होणार आहे.