आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणामुळे पालिका कर्मचारी आले अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राजकारणामुळे आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, असा आरोप ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.बाबा आढाव यांनी केला. या वेळी त्यांनी असंघटित कामगारांच्या पेन्शनकडे लक्ष वेधले.
श्रमजीवी कामगार ऑटोरिक्षा फेडरेशन जिल्हा हमाल-मापाडी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रविवारी लेवा भवनात असंघटित कामगारांचा मेळावा झाला. या वेळी डॉ.आढाव यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या नाकर्तेपणावर कडाडून टीका करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शरद पवार यांनी असंघटित कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले. तसेच असंघटित कामगारांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी खूप वर्षांपासून केली जात आहे. राजस्थान सरकार ५०० गोवा सरकार दोन हजार रुपये पेन्शन देत आहे. मग महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही? सध्या पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत बँकांमध्ये नागरिकांचे खाते उघडले जात आहे. त्यात केंद्र सरकारने कामगारांची पेन्शन टाकावी, अशी मागणी डॉ.आढाव यांनी केली. त्याचप्रमाणे राजकारण्यांमुळेच जळगाव महापालिकेवर आर्थिक संकट ओढवले असूनल सोयीच्या राजकारणासाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे, असेही ते म्हणाले. या वेळी कॉमेश सपकाळे, शरद चौधरी, गोविंद तिवारी, सदाशिव ढेकळे, देविदास भडंगर, विजय पवार, राजू हलबोटे, रमेश जैन आदी उपस्थित होते.