आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेच्या तिजोरीत जमा झाला तीन कोटींचा महसूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नोटाबंद झाल्यामुळे बाजारपेठेतील व्यवहारांवर परिणाम झाला असून उलाढाल मंदावली आहे. याच कारणामुळे भाजीपाल्याचे दर कमालीचे घसरले आहेत.
सराफ बाजार, कापड व्यावसायीक, किराणा दुकानदार, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्राॅनिक्स, भाजीपाला, फळविक्रेते आदी व्यावसायिक मंदीचा अनुभव घेत आहेत. सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये काही कारखान्यांमधील उत्पादन थांबले आहे. कामगारांना पगार देण्यासाठी सुटे पैसे नसल्याने कामगारांनी कामावर येणे बंद केले आहे, अशी माहिती कारखानदार ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिली. ५०० आणि एक हजाराच्या नोट्या स्वीकारण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील खोळंबलेल्या व्यवहारांना काहीअंशी चालना मिळेल, अशी अपेक्षा शहरात व्यक्त केली जात आहे.
केंद्रशासनाने एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर वुलीसाठी या नोटा स्वीकारण्यात आल्या. त्यामुळे ते २३ नोव्हेंबर या १५ दिवसांच्या काळात पालिकेच्या तिजोरीत तब्बल तीन कोटी रुपयांचा महसूल थकबाकीपोटी जमा झाला.

थकित करवसुलीसाठी पालिकेच्या आवारात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते. जुन्या नोटांचा भरणा करण्यासाठी या कक्षांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या. पालिकेकडून दरवर्षी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले जातात. मात्र, पालिकेच्या प्रयत्नांना थकबाकीदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. याच कारणामुळे शहरातील करदात्यांकडे पालिकेची आठ कोटी रुपयांची थकबाकी झाली होती. मात्र, नोव्हेंबरला नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर होताच पालिकेच्या करवसुलीचा वेग अनपेक्षितपणे वाढला. १५ दिवसांच्या काळात पालिकेची तीन कोटी रुपयांची करवसुली झाली. त्यामुळे मार्चअखेर आणखी पाच कोटी करवसुली करण्याचे उद्दिष्ट पालिकेला गाठावे लागणार आहे. चलनातून बाद झालेल्या नोटा गुरुवारपर्यंत (दि.२४) बीएसएनएल, पालिका, ग्रामपंचायत आणि वीज वितरणच्या कार्यालयात स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जुन्या नोटा आता ३० नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे पालिकेच्या कराचा भरणा करणाऱ्या थकबाकीदारांनी पालिकेत जाऊन करभरणा करता येईल. यामुळे पालिका प्रशासनाच्या तिजोरीत आगामी काही दिवसांमध्ये आणखी भर पडणार आहे.
वीज वितरणला धनलाभ : वीजवितरण कंपनीची शहरातील ग्राहकांकडे पाच कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र, जुन्या नोटा स्वीकारल्यामुळे वीज वितरणला दोन कोटी ५४ लाख रुपयांची वीज बिलांची थकबाकी वसुली पूर्ण करता आली आहे.

करवसुलीची प्रक्रिया थंडावली : तालुक्यातील३९ ग्रामपंचायतींमध्ये या काळात ३० लाख रुपयांची करवसुली झाली. करवसुलीचा आकडा आणखी वाढला असता. मात्र, ग्रामसेवक संघटनेने संप पुकारल्याने कर वसुलीला ब्रेक लागला अाहे.

^शहरवासीयांकडे पाचकोटी रुपयांची वीजबिलाची रक्कम थकित होती. मात्र, जुन्या नोटा स्वीकारल्याने कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश मिळाले. त्यामुळे थकबाकी कमी झाली. विलासनवघरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वीज वितरण

^शहरवासीयांना थकितकराचा भरणा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने तीन कोटी रुपयांची करवसुली झाली. बी.टी. बाविस्कर, मुख्याधिकारी
बातम्या आणखी आहेत...