आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशाभूल; पावसाळा संपूनही पालिकेची वृक्षलागवड शून्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी मानवी जीवनात वृक्षांचे महत्त्व विषद केले आहे. मात्र, पालिकेने या गंभीर विषयाची चेष्टा केली आहे. गेल्या चार वर्षांत पालिकेने पावसाळ्यात एकाही ठिकाणी वृक्षारोपण केले नाही. या उलट शहरात किरकोळ कारणांसाठी वृक्षतोडीसाठी परवानग्या देण्यात आल्या.
शहरात गेल्या उन्हाळ्यापासून वृक्षलागवडीची तयारी करावी, अशी मागणी पालिकेत नगरसेवकांनी केली होती. या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. पालिकेत वृक्षारोपणाचा ठराव नसल्याने तांत्रिक अडचणी मांडण्यात आल्या. याबाबत शहरात पुन्हा ओरड वाढल्यानंतर पालिका प्रशासनाने २० ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत वृक्षारोपणाचा विषय घेतला. विषय पत्रिकेत वृक्षारोपणाचा विषय पाहून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी वृक्षारोपणाला विनाविलंब प्रारंभ करून पंधरवड्यातच हे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करावे, अशी भूमिका मांडली होती. यावर मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी लवकरच हे काम पूर्ण करुन शहरातील सर्व प्रभागांमध्ये नगरसेवकांच्या मदतीने वृक्षारोपण होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, ऑगस्ट सप्टेंबर महिना उलटून आता ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपून हिवाळ्याला सुरुवात झाल्यावरही पालिकेने ठरावाप्रमाणे वृक्षारोपण केले नाही. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

अधिकारांचावापर नाहीच : शहरातपालिकेकडून वृक्षारोपण तर होत नाही या उलट वृक्षतोडच अधिक प्रमाणात होते. रेल्वे, आयुध निर्माणीच्या परिसरात सर्रास वृक्षतोड होत असताना वृक्ष अधिकारी म्हणून जबाबदारी असलेले मुख्याधिकारी कारवाई करत नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

^पालिकेने वृक्षारोपणासाठीवारंवार प्रयत्न केले, मात्र तांत्रिक अडचणींमुळे कामे पूर्ण झाली नाहीत. अमृत योजनेतून वृक्षारोपण करण्यासाठी प्रस्ताव आहे. यामुळे आगामी काळात शहरात व्यापक वृक्षारोपण केले जाणार आहे. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष

^दरवर्षी वृक्षारोपणाचेनियोजन केले जाते. प्रत्यक्ष वृक्षारोपण मात्र होत नाही. सर्वानुमते ठराव करून पुढील प्रक्रिया पूर्ण होणे, म्हणजे सभागृहाचा अवमानच आहे. सत्ताधारी संपूर्ण शहरवासीयांची दिशाभूल करीत आहेत. युवराज लोणारी, उपनगराध्यक्ष

९८ लाखांचा प्रस्ताव :शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून अमृत योजना राबवली जाणार आहे. अमृ़त योजनेतून ग्रीन स्पेस निर्माण करण्यासाठी नियोजन आहे. यासाठी शहरात व्यापक वृक्षारोपण करावयाचे आहे. यासाठी पालिकेकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. पालिकेने ग्रीन स्पेसनिर्मितीसाठी ९८ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र या प्रस्तावावर अद्यापही निर्णय झालेला नाही.

शहरवासीयांना प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास
शहराला लागूनच भुसावळ (दीपनगर) औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे. यासह रेल्वेचे विस्तीर्ण जाळे, आयुध निर्माणी, शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या, शहराच्या चहूबाजूंनी असलेला वीटभट्टी व्यवसाय, शहरांतर्गत भागातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग यामुळे शहराला प्रदूषणाचा विळखा आहे. व्यापक प्रमाणात वृक्षलागवड होऊन संगोपन झाल्यास शहरातील प्रदूषणावर मात करता येईल. मात्र पालिकेकडून सातत्याने वृक्षलागवडीबाबत उदासीन धोरण राबवले जाते. यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न आता जटिल होत आहे.
पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांची दिशाभूल
दोन महिन्यांपूर्वी २० ऑगस्टला झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरात पालिका फंडातून वृक्षारोपण करण्याबाबत ठराव करण्यात आला होता. मात्र, पावसाळा संपल्यानंतरही पालिकेने वृक्षारोपणाला सुरुवात केलेली नाही. शहरात गेल्या चार वर्षांपासून वृक्षकराची वसुली नियमितपणे होत असताना पालिकेच्या माध्यमातून वृक्षारोपणच झाले नसल्याची स्थिती आहे. करवसुलीत तत्परता दाखवणाऱ्या पालिकेबाबत नाराजी कायम आहे.
बातम्या आणखी आहेत...