आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणाबाबत पालिकेची नोटीस, ‘हरित शहर’ योजनेत पालिका घेणार सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ३१ जुलै रोजी अध्यादेश काढून ‘हरित शहर’ योजना राबवण्याचे ठरवले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय पालिकेलाही प्राप्त झाला असून, आता या योजनेतून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या काळात वृक्षारोपण करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार आहे. शहरातील मोकळ्या जागा, पाणथळ क्षेत्र आणि रस्त्याच्या दुतर्फा जागांची यात निवड करण्यात येईल. पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांकडून आराखडा तयार करून घेतला जाणार आहे.

सावलीदेणारे वृक्ष लावणार वृक्षलागवडीसाठीयंत्रणा निश्चित करणे, मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ वन आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय, स्वयंसेवी संस्थांचीही निवड करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक स्थिती, हवामान, मातीचा स्तर आणि पावसाचे प्रमाण आदींची माहिती घेऊन कोणत्या जातीची राेपे जगवायची, याचा विचार केला जाणार आहे. राेपांचा पुरवठा होण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. स्थानिक वृक्षांसह वनौषधी, सावली देणाऱ्या झाडांच्या प्रजातींचा या आराखड्यात समावेश असेल.
शहरात तीन वर्षांपासून पालिका प्रशासनाने ठराव करूनही वृक्षारोपण केले नाही. मात्र, यंदा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३१ जुलै रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार आता मान्सून २०१५पासून नागरी भागात ‘हरित शहर’ योजनेत भुसावळ पालिका सहभाग घेणार आहे. त्यासाठी सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची मदत घेण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
पर्यावरण संवर्धन सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे संकेत
भुसावळ तारऑफिस रोडवरील ‘हॉटेल पंचवटी गौरव’च्या बाजूला अतिक्रमण करण्यात आले होते. याप्रकरणी पालिकेने संबंधित हाॅटेलचे व्यवस्थापक नितीन माधव महाजन यांना नोटीस बजावली आहे. त्यात ३० दिवसांत कॉलम फुटिंग काढावे; अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.

अतिक्रमणप्रश्नी ‘दिव्य मराठी’ने २८ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन नगरपालिकेने हॉटेलला नोटीस बजावली. पालिकेच्या रस्त्याच्या जागेत तळमजल्यावर विनापरवाना कॉलम फुटिंगसाठी खड्डे खोदून अंदाजे १० बाय १२ फूट अंतरात बांधकाम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे बांधकाम मंजूर केलेल्या नकाशानुसार नसून, नियमबाह्य दिसून येत आहे. आतापर्यंत झालेले बांधकाम ३० दिवसांच्या आत पाडून टाकावे. तसेच कामासंबंधी केलेली कार्यवाही नगरपालिकेत लेखी कळवावी; अन्यथा पालिका हे बांधकाम पाडेल, अशा आशयाची नोटीस बजावली आहे. आता हे अतिक्रमण कधी निघते? याची शहरवासीयांना प्रतीक्षा आहे.

निधीचीही तरतूद
पालिकेनेवृक्षारोपणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. जिल्हा नियोजन विकास मंडळ, आमदार-खासदारांकडून मिळणारा स्वेच्छा निधी, उद्योजकता सामाजिक दायित्व निधी, नगरविकास विभागाच्या निधीतून ही योजना पूर्ण होईल.

संगोपनावर देणार भर
वृक्षजगवण्याचे प्रमाण ८० टक्के राहण्यासाठी विशेष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. किमान पाच वर्षांसाठी वृक्षांची जनावरे इतर बाबींपासून संरक्षण, निगा, जोपासना, संगोपन, पाणीपुरवठा आणि कायमस्वरूपी देखभालीची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

आराखडा तयार होणार
ऑगस्टचाशेवटचा आठवडा किंवा पावसाचा अंदाज घेऊन या योजनेतून वृक्षारोपण करणार आहोत. त्यासाठी सध्या नियोजन आराखडा तयार केला जात आहे. विजयचौधरी, प्रभारीनगराध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...