आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घंटा’विना धावताहेत मनपाच्या घंटागाड्या, 39 पैकी 7 घंटागाड्या बंदावस्थेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मनपाच्या आरोग्य विभागाकडून घरातील कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली होती. सकाळी ते दुपारी यावेळेत शहरात फिरून ओला कोरडा कचरा गोळा केला जातो. मात्र, या गाड्यांना घंटाच नसल्याचे समोर आले आहे.

१) महापालिकागल्लीतील कचरा गोळा करण्यासाठी वाहनांचा वापर करते. महापालिकेचे हे वाहन कचरा घेण्यासाठी आले, हे कळावे म्हणून कचरा संकलनाच्या वाहनांना पितळी घंटा बसवण्यात आले आहेत, त्यामुळे या वाहनांना घंटागाडी असे संबोधले जाते.
२) अर्धाकिलो वजनाच्या पितळी घंटा किमान ४०० ते ५०० रुपयांना मिळतात. आजच्या घडीला त्यांची किंमत वाढलेली असावी; मात्र गेल्या काही दिवसांपासून घंटेशिवायच या गाड्या शहरातील विविध भागात जाऊन कचरा संकलित करीत आहेत.
३) आरोग्यविभागाच्या ३९ पैकी घंटागाड्या बंदावस्थेत आहेत. पैकी गाड्यांना घंटा नाही. ज्या घंटागाड्या सुरू आहेत. त्यापैकी किमान २५ गाड्यांना घंटा नाही. या गाड्यांवरील घंटे चोरीस गेले असल्याचा संशय यापूर्वीही व्यक्त केला आहे.
४) शहीदभगतसिंग संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर यांनी चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच संबंधितांकडून घंटा खरेदीसाठी झालेला खर्च वसूलीची मागणी केली आहे.