आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा महिला बालकल्याणात घाेटाळा, सुमारे सात लाखांची अनियमितता उघडकीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मनपाच्या महिला बालकल्याण विभागात तरतूद करूनही याेजनांवर खर्च करणे, कार्यशाळा घेण्याचे भासवणे, स्पर्धांचे अायाेजन करता त्यावर खर्च दाखवून सुमारे सात लाख रुपयांची अनियमितता उघडकीस अाली अाहे. याप्रकरणी आयुक्तांनी सेवानिवृत्त सध्या कार्यरत अधिकाऱ्यांना अंतिम नाेटीस बजावली अाहे. तर संबंधितांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे.

महिला बालकल्याण विभागातील चाैकशीनंतर ३१ अाॅक्टाेबर २०१५ राेजी दिलेल्या अहवालानंतर अायुक्त संजय कापडणीस यांनी बालवाडी विभागाचे निवृत्त अधीक्षक मधुकर बाबुराव पवार, लिपिक छगन यशवंत महाले, वरिष्ठ लिपिक प्राची मनाेहर गारे तसेच कार्यरत अधीक्षक चंद्रकांत वांद्रे लिपिक सुभाष मराठे यांना अंतिम नाेटीस बजावली अाहे. यात २००८-०९ ते २०१०-११ या तीन वर्षांतील अनियमिततेबाबत लाख हजार १५५ रुपयांचा ठपका ठेवला अाहे.

चुकीच्याठिकाणी केला खर्च : शासननिर्णयानुसार महिला बालकल्याणासाठी टक्के तरतूद करण्यात अाली हाेती. हा निधी याेजनांवर खर्च करणे अपेक्षित असताना ताे झाला नसल्याचे चाैकशीत उघडकीस अाले अाहे. सांस्कृतिक कार्यक्रमात नाटक, प्राैढ शिक्षणासाठी खर्च करून सावित्रीबाई फुले सुवर्ण जयंती साजरी केली. हा शासकीय कार्यक्रम असल्याने निधीतून खर्च करता येत नसतानाही खर्च दाखवला आहे.

वस्तूंची नियमबाह्य खरेदी
सन२००८-०९ मध्ये प्रेस्टिज कुकर, सायकल खरेदी, शिवणयंत्रे, साडी ब्लऊज खरेदी, या सर्व वस्तंूच्या खरेदीत ५० हजारांपेक्षा जास्त रकमेची खरेदी असल्याने निविदा मागवणे अावश्यक हाेते. परंतु, निविदाप्रक्रिया टाळण्यासाठी कामाचे तुकडे करून दरपत्रके मागवून केलेली खरेदी नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवण्यात अाला अाहे. यात खरेदी केलेल्या वस्तूंची नाेंदही केलेली नाही.

चुकीची माहिती देणे भाेवले
अास्थापनाविभागाचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक नारायण जगताप यांनाही अंतिम नाेटीस बजावली अाहे. त्यांच्यासह सध्या कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांनी महिला बालकल्याण समितीस शहानिशा करता चुकीची माहिती सादर केली. याबाबत समितीने नाराजी व्यक्त केली हाेती. यात हलगर्जीपणा केल्यामुळे निवृत्ती वेतनातून दरमहा १५ टक्के पेन्शन कमी का करण्यात येऊ नये? अशी नाेटीस बजावली अाहे.