आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा महिला कर्मचाऱ्याला हाॅकर्सकडून बेदम मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रस्त्यावरील हाॅकर्सविरुद्ध सुरू असलेल्या कारवाई सत्राला हाणामारीने गालबोट लागत अाहे. शुक्रवारी दुपारी सुभाष चाैकात हाॅकर्सचा माल जप्त करत असताना हाॅकर्सने महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. हा प्रकार पाहून पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी देखील महिलेला मारहाण करणाऱ्या तरुणाला चाेप देत पाेलिसांच्या ताब्यात दिले. हाणामारीत महिला कर्मचारी जखमी झाली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. अाधीच हप्तेखाेरीचा अाराेप हाेत असतांना अशा प्रकारचे हल्यामुळे तर्कविर्तक लावले जात अाहे.
महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या हाॅकर्सविरुद्ध कारवाई सुरू केली अाहे. गेल्या सहा महिन्यांत अनेकदा कारवाई झाल्यानंतरही पुन्हा हॉकर्स त्याच ठिकाणी व्यवसाय करीत अाहे. प्रमुख रस्ते मोकळे व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत महासभाही त्या पद्धतीने ठराव करत अाहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईला बळ मिळत अाहे. परंतु अाता हा वाढता संघर्ष महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगाशी येऊ लागला अाहे. गेल्या आठवड्यातील घटनेनंतर शुक्रवारी दुपारी वाजता माल जप्त करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला विक्रेत्याकडून बेदम मारहाण झाल्याने कर्मचारी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आलेल्या मनपा महिला कर्मचारी रहेनाबी शेख तस्लीम, विशाल भाेई हा तरुण भुईमुगाच्या शेंगा विक्री करण्यासाठी हातगाडी घेऊन सुभाष चौकाकडे येत हाेता. दरम्यान मागच्या गल्लीतून कारवाई करून पथकातील महिला कर्मचारी रहेनाबी शेख तस्लीम यांनी रस्त्याने जाताना त्याला हटकले. परंतु त्यानंतरही ताे एेकत नसल्याने त्याचा माल तराजू काटा जप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या हाॅकर्सने रहेनाबी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांनीही त्याचा प्रतिकार केला परंतु संतप्त हाॅकर्सने अक्षरश: महिला कर्मचाऱ्यास जमिनीवर पाडून मारहाण केली. दरम्यान, त्याला पकडण्याच्या नादात कर्मचारी सलमान भिस्ती अाशाबाई रानडे यांनाही मार लागला. त्यामुळे संतापलेल्या मनपा कर्मचाऱ्यांनीही हाॅकर्स विशालला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यावर हात उगारल्याने विशालच्या वडिलांनीही त्याच्या कानशिलात लगावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...