आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीकृत’साठी नव्या चेहर्‍याचा मनपा घेत आहे शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेचे स्वीकृत सदस्य करीम सालार यांनी 18 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर सहा महिन्यांपासून हे पद रिक्त असून सत्ताधारी गटाला अल्पसंख्याक गटातील उदयोन्मुख नेतृत्व देण्यासाठी शोध घ्यावा लागत आहे. लोकसभा, विधान परिषद आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतरच या पदी नवीन चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. पालिकेच्या तिसर्‍या सभागृहासाठी ऑक्टोबर 2013मध्ये स्वीकृत सदस्य निवडप्रक्रिया झाली होती. या प्रक्रियेला सहा महिने पूर्ण होण्याआधीच करीम सालार यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. दरम्यान, नवीन सदस्य निवडीसाठी हालचाली सुरू झालेल्या असताना लोकसभेची आचारसंहिता आडवी आली. रिक्त जागेवर खान्देश विकास आघाडीतर्फे सालार यांच्या तोडीचा अल्पसंख्याक समाजातील चेहरा देण्याच्या हालचाली सुरू होत्या. यासाठी मेहरूण परिसरातील डॉ.सईद शहा यांचे नाव पुढे आले होते. मात्र, शहा यांच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आवश्यक पात्रतेसंदर्भात तांत्रिक अडचणी असल्याने हे नाव मागे पडले आहे. त्यांच्या जागी नवीन चेहर्‍याचा शोध आघाडीकडून घेतला जात आहे.
आडवाणी एकदाही पराभूत नाहीत
सिंधी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अशोक मंधान, विजय गेही, भगत बालाणी यांनी पालिकेत प्रतिनिधित्व केले. मात्र, यातील काहींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, राजकुमार आडवाणी हे अद्यापही पराभूत झालेले नाही, ही त्यांची जमेची बाजू आहे.
इतर समाजालाही संधी
खान्देश विकास आघाडीकडे अल्पसंख्याक समाजातील तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे पर्याय म्हणून इतर समाजाला आकृष्ठ करण्याचा विचार आघाडीतर्फे होऊ शकतो. सिंधी समाजाला जवळ करण्याच्या दृष्टीने विचार केला जाऊ शकतो. आघाडीकडे सिंधी समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या एकमेव राजकुमार आडवाणी यांनी कौटुंबिक कारणाने पालिका निवडणूक लढवली नव्हती. त्यांच्या माध्यमातून भाजपकडून सिंधी समाज आपल्याकडे वळवण्यासाठी आडवाणींच्या नावाचा विचार होऊ शकतो.