आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात अजूनही 230 ठिकाणी पाणी गळती; पाणीपुरवठा विभागाने सादर केला अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-शहरातील विविध भागात अजूनही 230 ठिकाणी गळती असल्याचा अहवाल स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला. अजून काही जणांचे अहवाल मागवले असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता डी.एस. खडके यांनी स्पष्ट केले. या दुरुस्तीसाठी 18 लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे सांगितले.
शहरातील पाणी गळतींसंदर्भात ‘गळत्यांची राखतील आब ‘दिव्य मराठी’चे किताब’ हे अभियान राबवण्यात येत आहे. शहरातील गळत्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा यांनी दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता डी. एस. खडके यांनी आपला अहवाल सादर केला. शहरातील विविध भागात सद्या 230 ठिकाणी पाणी गळती असल्याची माहिती दिली. यात व्हॉल्व्हवर 59 ठिकाणी तर 171 ठिकाणी पाइपलाइनवर गळती लागल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व शाखा अभियंत्यांना दिले असून काही अहवाल प्राप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिकार्‍यास दोन लाखांपेक्षा कमी साहित्य खरेदीचे अधिकार
गळत्या बंद करण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 चे अनुसूची ‘ड’ मधील प्रकरण 5 (2) (2) नुसार उपअभियंत्यांना निर्देश देण्यात आले आहेत. कायद्यातील या तरतुदीमुळे आयुक्त किंवा आयुक्त प्राधिकृत करेल, अशा अधिकार्‍यास दोन लाखांपेक्षा कमी खर्चाचे साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा मागवता किंवा न मागवता संविदा करण्यास प्राधिकृत करण्याची तरतूद आहे. मात्र, यासाठी स्थायी समितीच्या कार्यवृत्तात तसे कारण नमूद करावे लागते.