आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या २५ काेटींच्या कामांमध्ये फेरबदलाचा प्रयत्न, बांधकाम विभागातर्फे सर्वेक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेने महासभेत मंजूर केलेल्या २५ काेटींचा निधी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला असताना अाता त्याच कामांच्या यादीत फेरफार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय श्रेयाच्या स्पर्धेतून ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला अाहे. परंतु यापूर्वीच्या कामांची यादी सर्वसमावेशक असून सर्वांशी चर्चेअंतीच तयारी केली आहे. यात फेरबदल करण्यात काही अर्थ नसल्याचे खान्देश विकास आघाडीचे म्हणणे अाहे. एकंदर शासनाने मंजूर केलेल्या २५ काेटींतील कामांची मंजुरीप्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना अाता त्यातील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. 
 
गेल्या दाेन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ काेटींच्या निधीचा विषय अाता जळगावकरांच्या ताेंडपाट झाला अाहे. निधी मंजूर हाेत नव्हता तेव्हाही चर्चा हाेती अाणि अाता निधी मंजूर हाेऊन प्राप्त हाेण्याची प्रतीक्षा असतानाही याबाबत तर्कवितर्क काढले जात अाहेत. यापूर्वीच २५ काेटींचा निधी काेणाच्या माध्यमातून मिळाला काेणाच्या कामांना जास्त प्राधान्य द्यावे, यावरून चांगलेच राजकारण पाहायला मिळाले अाहे. या निधीतून प्रमुख रस्त्यांसह गटारींची कामे घेण्यात अाली असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला अाहे. 

त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नसताना अाता अामदार सुरेश भाेळे यांनी चांगल्या रस्त्यावर पुन्हा खर्च करण्यापेक्षा काॅलनी परिसरातील गरजेच्या कामांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली अाहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्वेक्षण सुरू अाहे. अतिअावश्यक कामांना महत्त्व देण्याची भूमिका असलेल्या अामदार भाेळेंकडून कामाच्या यादीत बदलासाठी प्रयत्न सुरू अाहेत. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत कामांना मंजुरी निधी प्राप्तीचे काय हाेते, याबाबत उत्सुकता अाहे. 
 
मुख्यमंत्र्यांना पत्र देणार 
मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या २५ काेटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पडून अाहे. यात शहरातील प्रमुख रस्त्यांसह काही कामांचा समावेश अाहे. शासनाच्या पत्राच्या अनुषंगानेच प्रस्ताव दिला असल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून निधी वर्ग करण्याची विनंती केली जाणार अाहे. २५ काेटींचा निधी मनपाला प्राप्त हाेऊन कामे मार्गी लागणे गरजेचे अाहे- नितीन लढ्ढा, महापाैर. 
 
त्याच त्या कामांवर खर्च कशाला 
२५ काेटींतून करायच्या कामांची चर्चा व्हायला हवी हाेती. परंतु जे रस्ते चांगले अाहेत त्यांच रस्त्यांच्या कामांवर खर्च करणे उचित नाही. त्यापेक्षा काॅलनी परिसरातील रस्ते गटारींच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे अाहे. वास्तविक हा निधी अामदारांना त्यांच्या मतदारसंघातील मूलभूत सुविधांसाठी मंजूर केला अाहे. यात काेणाला फायदा व्हावा हा हेतू नाही- सुरेशभाेळे, अामदार. 
 
बातम्या आणखी आहेत...