आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरपोळे येथे राजकीय वादातून एकाचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत नव्याने विजयी आमदार यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर मयताचा फोटो लावल्याचा राग मनात बाळगून तालुक्यातील तिरपोळे येथील माजी सरपंचाचा भाऊ लहू भावराव मोरे (वय ३५) यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करुन खून केल्याची घटना शनिवार दि. रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला असून सात जणांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तालुक्यातील तिरपोळे गावातील मयत लहू भावराव मोरे वय ३५, ज्ञानेश्वर अंकुश मोरे, विजय धुडकू मोरे, भुरा राजेंद्र कदम, ज्ञानेश्वर मधूकर गोपाळ, संदीप दगा मोरे हे गावातील एका दुकानाजवळ रात्री गप्पा मारत होते. गप्पा आटोपल्यानंतर सर्वजण घरी जाण्यास निघाले असता भटा शंकर शेटे यांच्या घरासमोर कैलास भटा शेटे, सचिन भटा शेटे, दिपक सुमंत शेटे, मोहन शामराव शेटे, मोहन शामराव शेटे, सचिन झुंबर तिरमली, अशोक युवराज तिरमली, रवींद्र राजू बेलदार, मच्छींद्र झुंबर तिरमली सर्व रा. तिरपोळे या जमावाने हातात लाठ्या-काठ्या,लोखंडी सळई, पाईप इतर साधनांचा वापर करून वरील सहा जणांवर हल्ला केला. या हाणामारीत सचिन भटा शेटे याने लोखंडी पाईपने लहू भावराव मोरे यांच्या डोक्यात वार करून जीवे ठार मारले तर इतर पाच जण गंभीर जखमी झालेत.

रात्री उशीरापर्यंत गावात तणाव निर्माण होता. तातडीने मेहूणबारे पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांनी कर्मचार्‍यांसोबत गावात धाव घेत दोन्ही गटातील तणाव शांत केला. हाणामारीत जखमी झालेल्या जखमींना तातडीने मेहूणबारे ग्रामीण रूग्णालय इतर ठिकाणी दाखल केले. परंतु डॉ. सचिन कुमावत यांनी लहू मोरे यांना मृत घोषित केले होते. वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध घेऊन सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसात संशयित आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.