आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 मारेकऱ्यांनी डॉ. मोरे यांची हत्या केल्याचा संशय, 3 तरुणांनी मारेकऱ्यांना पाहिल्याची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॅ.अरविंद मोरे यांच्या हत्या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मंगळवारी पोलिसांच्या हाती लागले. पाच ते सहा मारेकऱ्यांनी डॉ.मोरे यांची हत्या केली असून या मारेकऱ्यांना परिसरातील तीन तरुणांनी पाहिले असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याची माहिती समोर येत आहे.
 
घटनेच्या तीन दिवस आधी डॉ.मोरे यांच्या पार्वतीनगर येथील राहत्या घरासमोर तीन-चार अज्ञात व्यक्ती आल्या होत्या. डॉ.मोरे यांच्याशी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. सोमवारी उत्तररात्री ते वाजेच्या दरम्यान पाच ते सहा जण पुन्हा पार्वतीनगरात आले होते. यातील दोघे घराबाहेर, दोघे डॉक्टरांच्या घरात तर आणखी दोन जण परिसरात दुचाकीवरून पहारा देत होते. याच परिसरातील तीन युवकांनी संशयितपणे फिरणाऱ्या लोकांना पाहिले असून त्यांनी किंचाळी देखील ऐकल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली आहे. मंगळवारी डॉ.मोरे यांच्या ‘रहस्यमय हाय प्रोफाइल ’हत्या प्रकरणाचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
अत्यंत शांत स्वभाव असलेले डॉ.अरविंद सुपडू मोरे (वय ५६ ) यांची गळा कापून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी काेणत्याही प्रकारचा पुरावा ठेवलेला नसल्यामुळे हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर ठाकले होते. दरम्यान, रविवारी सोमवारी वेगवेगळे तीन पथक तयार करून तपासाला सुरुवात करण्यात आली. खबऱ्यांनाही ‘चार्ज’ करण्यात आले. डॉ.मोरे यांनी नोकरी नाशिक धुळे जिल्ह्यात अधिक काळ केली होती. जळगावात त्यांच्या परिचयाचे लोक नव्हतेच म्हणून पोलिसांनी धुळे, नाशिक जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु, सोमवारी दुपारी वाजता पोलिसांना या खुनातील अत्यंत महत्त्वाचे धागे-दोरे जळगावातूनच हाती लागले. हत्येच्या तीन दिवस आधी डॉ.मोरे यांच्याशी काही व्यक्तींनी वाद घातले होते. तर सोमवारी पहाटे ते वाजेच्या कालावधीत डॉ.मोरेंच्या घराखाली दोन व्यक्ती उभ्या होत्या. तर एकापेक्षा जास्त व्यक्ती वरच्या मजल्यावरील घरात शिरल्या होत्या. 

या सर्व प्रकाराचा पहारा देण्यासाठी विनानंबर प्लेटच्या एका दुचाकीवरून दोन व्यक्ती दर, पाच मिनिटांनी याच परिसरात भटकत होत्या. संशयितपणे सुरू असलेला हा प्रकार परिसरातील तीन युवकांनी पाहिल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी काही मिनिटांनी मोठ्याने किंचाळी देखील ऐकली आहे. डॉ.मोरेंच्या गॅलरीतून खाली उडी घेत एकाने पोबारा केला आहे. अंगाला शहारे आणणाऱ्या संपूर्ण घटनाक्रमाची पोलिसांना सोमवारी दुपारी माहिती मिळाली. पोलिस उपअधीक्षक नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने या घटनाक्रमानुसार तपासाला गती दिली आहे. संशयितपणे फिरणारेलोक, किंचाळी, गॅलरीतून उडी घेणारा व्यक्ती या घटना डॉ.मोरेंच्या खून प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा अाहे. हा प्रकार पाहणारे युवकांपर्यंत पोलिस पोहचले असून त्यांच्याकडून आणखी माहिती काढण्याचे काम सुरू आहे. 
 
नाशिकला महिलेची चौकशी 
डॉ.मोरेयांच्या मोबाइलवरून नाशिक येथील एका ५० वर्षीय महिलेशी दररोज बोलणे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रविवारपासूनच नाशिकला मुक्कामी आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता या पथकाने संबंधित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. डॉ.मोरे यांच्याशी संपर्कात असल्याचे महिलेने कबुल केले आहे. मात्र, त्यांच्या खून प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचा जबाब त्यांनी दिला आहे. तसेच डॉ.मोरे यांच्या सोबतही काही भांडण झाल्याचे महिलेचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी नाशिक येथे डॉ.मोरेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी डॉ.मोरे यांच्या काही वस्तू नाशिक येथे नेऊन कुटुंबीयांना दाखवल्या. त्यांची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पुन्हा वस्तू ताब्यात ठेवल्या आहेत. 
 
जळगावात तपासणी 
डीवायएसपी नीलोत्पल यांचे विशेष पथक जळगावात माहिती घेत आहे. डॉ.मोरे यांचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयात रविवार सोमवारी चौकशी करण्यात आली. त्यांच्या सहकारी डॉक्टरांकडून माहिती घेण्यात आली. या पथकाने पार्वतीनगर परिसरातील काही नागरिकांशी संवाद साधून माहिती घेतली. 
 
डॉ.मोेरे यांच्या खून प्रकरणाने अत्यंत रहस्यात्मक स्वरूप घेतले आहे. रविवारी जळगाव धुळ्याच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून नमुने घेतले होते. तर सोमवारी नाशिक येथील पथक घटनास्थळी आले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पायांचे ठसे उमटलेले आहेत. या ठशांचे फोटो नाशिक फॉरेन्सिक टीमने घेतले. घटनास्थळी किती लोक होत याची माहिती यातून मिळणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...