आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशवाडीत वादातून चॉपरने तरुणाचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेशवाडीत जुन्या वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. गणेशवाडीतील सुरेश अभिमन पाटील (वय ५०) हा करिश्मा हाॅटेलजवळ अंडाभुर्जीचा व्यवसाय करतात. त्यांना भूषण चंद्रकात अशी दाेन मुले आहेत. भूषणचा गणेशवाडीतील िचंग्या ऊर्फ चेतन आळंदे याच्याशी जुना वाद हाेता.

गुरुवारी अंडाभुर्जीची गाडी बंद करून भूषण त्याच्या हीराेहाेंडा माेटारसायकल (एमएच-१९-६३३९)ने रात्री ११ वाजेच्या सुमारास बाहेर जाण्यास निघाला. गणेशवाडीतील दत्तमंदिराजवळ चेतन आळंदे त्याच्या १० ते १५ मित्रांनी त्याला अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी भूषणने वडील सुरेश पाटील यांना फाेन करून बाेलावले. भाऊ चंद्रकांतसह ते वडील घटनास्थळावर आले. त्या वेळी चंद्रकांतच्या पाेटावर चाॅपरने सहा वार सुरेश पाटील यांच्या पाठीवर दाेन वार केले. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर दाेघांना उचलून उपचारासाठी िजल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी डाॅ. हिरा दामले यांनी त्याला मृत घाेषित केले.