आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.मोरेंच्या खोलीत महिलेच्या पायांचे ठसे, सहकारी डॉक्टर्स अन‌् नर्स यांचीही केली चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.अरविंद मोरे यांच्या हत्येच्या वेळी घरात सांडलेल्या रक्ताच्या थारोळ्यात महिलांच्या पायाचे ठसे असल्याचा संशय फॉरेन्सिक पथकासह पोलिसांनी बुधवारी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या रहस्यमय हत्या प्रकरणात चांगलीच कलाटणी मिळाली असून पोलिसांनी नाशिक, भुसावळ, धुळे येथील काही महिलांना जळगावात आणून चौकशी केली आहे. 
 
डॉ.मोरे यांच्या हत्या प्रकरणात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिस तपासात काही महत्त्वाच्या हालचाली पोलिसांकडून झालेल्या आहेत. डॉ.मोरे यांच्या संपर्कात असलेल्या तीन महिलांची चौकशी मंगळवारी रात्री बुधवारी करण्यात आली आहे. यात एक महिला नाशिक शहरातील असून दोन महिला भुसावळातील रहिवासी आहेत. याशिवाय डॉ.मोरे यांनी नोकरी केलेल्या नाशिक, शिरपूर, धुळे जळगावातील त्यांचे सहकारी डॉक्टर्स, महिला डॉक्टर्स, नर्स यांचीही चौकशी बुधवारी करण्यात आली. डॉ.मोरे यांची काही महिलांशी ओळख होती. सातत्याने त्यांचे महिलांशी संपर्क सुरू होते. त्यामुळे या हत्येमध्ये ‘महिलां अँगल’ असल्याच्या तथ्यापर्यंत बुधवारी पोलिस पोहचले आहेत. त्याच दिशेने त्यांनी तपासाला गती दिली आहे. 
 
‘त्या’युवकांकडून घेतली माहिती : डॉ.मोरेयांची हत्या झाली त्या दिवशी पार्वतीनगरातील त्यांच्या घराखाली पाच ते सहा तरुण संशयितपणे फिरत असल्याची तसेच किंचाळी ऐकल्याची माहिती तीन युवकांनी दिली होती. या युवकांकडून पोलिसांनी बुधवारी अधिक माहिती जाणून घेतली. घटनेची वेळ संशयितांच्या हालचाली कशा होत्या? यासंदर्भातही पोलिसांनी माहिती मिळवली असून पुढे तपास सुरू ठेवला आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे ३.३० वाजता पार्वतीनगरात महापालिकेचा पाणीपुरवठा सुरू झाला होता. त्यावेळी पाणी सोडण्यासाठी अालेले मनपा कर्मचारी किंवा पाणी भरण्यासाठी रहिवासी घराबाहेर होते की, मारेकरी होते? याचाही पोलिस तपास करीत आहेत. 
 
डॉ.मोरेंच्या पोटात अन्न नाही 
सोमवारीरात्री वाजता डॉ.मोरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या पोटात अन्नच नसल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी ११ वाजेनंतर त्यांनी कोणाचेही फोन कॉल रिसिव्ह केले नाही. शिवाय जेवणही केले नाही. तसेच त्यांच्या पत्नी नीलिमा यांचे फोन उचलल्यामुळे त्यांनी सायंकाळी डॉ.मोरे यांना मेसेज केला होता. त्याचाही रिप्लाय त्यांनी दिला नाही. डॉ.मोरे यांच्यावर सोमवारी पहाटे २.३० वाजता वार झाले आहेत; परंतु, रविवारी दिवसभर ते जेवले नाही तसेच कोणाशी बोललेदेखील नाहीत या दाेन्ही गाेष्टी हत्येच्या रहस्यात अधिक वाढ घालत आहेत. 
 
चाकू घरातलाच 
डॉ.मोरे यांचा गळा चिरण्यासाठी वापरलेला चाकू त्यांच्या घरातीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे. चाकूवर असलेल्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...