आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murder In Bhusawal, Farmer Corporator Mohan Barate Death

भुसावळात भरदिवसा माजी नगरसेवकाच्या वडिलांचा धारदार शस्त्राने भोसकून खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरात वर्दळीच्या जामनेर रोडवरील वाल्मीक चौकात रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा प्रख्यात मल्ल मोहन मुनीर बारसे यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता वाजता घडली. पोलिसांनी या घटनेबाबत माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरीसह सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वाल्मीक चौकात मोहन बारसे हे माजी नगरसेवक संतोष बारसे यांचे वडील मोहन बारसे (वय 67) हे उभे असताना त्यांच्यावर अचानक सहा जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच वाल्मीकनगरातील युवकांनी धाव घेऊन बारसेंना डॉ. राजेश मानवतकरांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर हॉस्पिटलच्या आवारात शेकडोंच्या जमावाने गर्दी केली. आमदार संजय सावकारे यांनी संतप्त जमावाला शांत करून मृतदेह सहकाऱ्यांच्या मदतीने पालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलिस अधीक्षक नंदकिशोर ठाकूर, डीवायएसपी रोहिदास पवार, एलसीबीचे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी घटनास्थळी भेट देऊन मृताच्या नातेवाइकांची विचारपूस केली. घटना घडल्यानंतर संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
काेण हाेते माेहन बारसे?
मृत माेहन बारसे हे रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी व माजी नगरसेवक संताेष बारसे यांचे वडील हाेते. कुस्त्यांचा अाखाडा त्यांनी गाजवला अाहे. राज्यस्तरीय कुस्त्यांच्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांनी काम केले अाहे. शहरात जातीय, धार्मिक कारणांवरून तणाव निर्माण झाला म्हणजे ते दाेन्ही गटांना शांत करण्यासाठी सामंजस्याची भूमिका घ्यायचे.

अाराेपींमध्ये यांचा अाहे समावेश
माेहन बारसेंच्या खूनप्रकरणी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चाैधरी, नट्टू चावरिया, गाेपाळ शिवराम शिंदे, बंटी परशुराम पथराेड, विजय परशुराम पथराेड, जॅकी इंदल पथराेड (सर्व रा. भुसावळ) अशा सहा जणांवर मिथून माेहन बारसे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. घटना घडल्यानंतर सर्व अाराेपी पसार झालेले अाहेत.
गुन्ह्यात तलवारसह पिस्तूलचा वापर
मारेकऱ्यांनी गुन्ह्यात पिस्तूल, तलवार, चाॅपर, लाेखंडी पाइपचा वापर केला अाहे. जुन्या राजकीय वैमनस्यातून अाराेपी अनिल छबीलदास चाैधरी याने कट कारस्थान रचून साथीदारांना चितावणी देऊन बारसेंच्या डाेक्याला पिस्तूल लावून चाकूने भाेसकले. अन्य अाराेपींनी तलवार, चाॅपरसह धारदार शस्त्रांनी वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाजारपेठ पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तपास उपनिरीक्षक अाशिष शेळके, सुनील साेनवणे, प्रवीण ढाके, युवराज नागरत हे करीत अाहेत

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो....