आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात दारूच्या नशेत मित्राचा खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दारूच्या नशेत सुरू असलेल्या मस्तीत एकाचा दगडावर डोके आटपून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास समाधान शंकर सपकाळे याने दारूच्या नशेत कोणतेही कारण नसताना छन्नू चिंधू बाविस्कर यांचेशी वाद घातला. सुरुवातीला अंगमस्ती करीत असताना दारूच्या नशेत असलेल्या सपकाळे याने वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दरम्यान याच वेळी सपकाळे याने बाविस्करचे डोके बाजूच्या एका दगडावर आपटले. यात बाविस्कर गंभीर जखमी झाला. या वेळी एक महिला या दोघांचे भांडण पाहत होती. भांडण विकोपाला गेल्याचे पाहून ती भांडण सोडवण्यासाठी गेली असता, तिलादेखील या भांडणात दुखापत झाली. दरम्यान त्या महिलेसह जखमी बाविस्कर यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना छन्नू बाविस्कर याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास तालुका पोलिसांनी आरोपी सपकाळे यास अटक केली. याबाबत प्रमिला छगन बाविस्कर या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर करीत आहे.