आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उसनवारीच्या पैशांतून महिलेचा खून; जालन्यातील पिता-पुत्र ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण तलाव परिसरात एप्रिलला २०१४ रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी जालना जिल्ह्यातील पिता-पुत्रांना ताब्यात घेतले असून उसनवार दिलेल्या पैशांतून महिलेचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
साडेतीन महिन्यांनंतर म्हणजे २६ जुलै २०१४ला महिलेची ओळख पटली होती. ती जालना जिल्ह्यातील मौजेपुरी तालुक्यातील तळणी येथील वत्सलाबाई शिवाजी सदावर्ते (वय ४५) असल्याचे समोर आले होते. त्या वेळी पोलिसांनी संशयावरून भगवान उघडे आणि ज्ञानेश्वर उघडे यांना ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते.
अशी पटली ओळख : एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी जालना एलसीबीच्या कार्यालयात गेले होते. तेथे मिसिंगच्या डायरीत वत्सलाबाईंचा फोटो पाहिला. तेथे ओळख पटली. पोलिसांनी वत्सलाबाई तिच्या आईच्या रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणी केली होती. त्यानंतर मृतदेह वत्सलाबाईंचाच असल्याचे सिद्ध झाले होते.
उधारीच्या पैशांतून खून
वत्सलाबाई सदावर्ते यांचे मुंबईतील घर विकल्यानंतर त्यांनी आलेला पैसा गावाकडे व्याजाने दिला होता. त्यातील एक लाख रुपये जालना जिल्ह्यातील हिवरा येथील गोपीचंद राजाराम उघडे (वय ५५) यालाही दिले होते. वत्सलाबाई या पैशांचा तगादा लावत होत्या. मात्र, उघडे यांना पैसे परत करायचे नव्हते, म्हणून गोपीचंद आणि त्याचा मुलगा ज्ञानेश्वर उघडे या दोघांनी मिळून वत्सलाबाईंचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी हिवरा येथून ताब्यात घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...