आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून खून; लहान पुलाखाली फेकला मृतदेह- वनमालाबरोबर होते संबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपती मंदिर पुलाखाली मृतदेह आढळल्याने पाहण्यासाठी झालेली गर्दी. - Divya Marathi
गणपती मंदिर पुलाखाली मृतदेह आढळल्याने पाहण्यासाठी झालेली गर्दी.
धुळे- येथीलगणपती मंदिरानजीक असलेल्या पुलाखाली ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस अाली. अनैतिक संबंधातून हा खून झाला असावा, अशी शक्यता पाेलिसांनी वर्तविली अाहे. साक्री राेड परिसरातील मिशन कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या सचिन जाेशी याचा हा मृतदेह असल्याचे पाेलिसांनी सांगितले. काल विवाहितेला जाळून मारल्याच्या घटनेनंतर शुक्रवारी खुनाची घटना घडली. दाेन अाठवड्यात अनैतिक संबंधातून अातापर्यंत चार खून झाल्याचे उघड झाले अाहे. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

पांझरा नदीच्या काठावर असलेल्या गणपती मंदिराजवळ असलेल्या काजवे पुलाच्या दाेन नंबरच्या कमानीखाली एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थाराेळ्यात पडला असल्याचे सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या काही जणांच्या लक्षात अाले. याबाबत पाेलिसांना माहिती मिळाल्यावर पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सुरुवातीला नदीपात्र काेणत्या पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येते यावरून शहर देवपूर पाेलिसांपैकी काेणाकडे याची नाेंद करावी याबाबत हद्दीचा मुद्दा उपस्थित करण्यात अाला. अप्पर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनीहद्द शहर पाेलिस ठाण्यामध्ये असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडण्यात अाली.
सुरुवातीला मृतदेह नेमका काेणाचा अाहे असा प्रश्न निर्माण झाला. मात्र गर्दीतील लाेकांनी सदर इसम हा मिशन कंपाऊंडमध्ये राहत असल्याचे सांगितले. त्यावरून माहिती काढली असता सचिन रमेश साळवे (जाेशी) (वय ३०) याचा असल्याचे स्पष्ट झाले. ताे इलेक्ट्राॅनिकचे काम करीत हाेता. त्यांच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने संपूर्ण अंगावर रक्त सांडले हाेते.
तसेच मृतदेहाजवळ एक अाेढणीवजा स्कार्फ अाढळून अाला. त्यामुळे खुनामागे प्रेमसंबंध, अनैतिक संबंधाची पार्श्वभूमी असल्याची शक्यता पाेलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केली. सचिनची अाई नकाणे राेडवरील एका खासगी रुग्णालयात काम करते अाणि तेथेच राहत असल्याने दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या अाईला मृतदेह दाखविण्यात अाला. तिने मृतदेह हा अापला मुलगा सचिन याचा असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी त्याच्या मृतदेहावर पाेलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात अाले. घटनास्थळी अप्पर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पाेलिस अधिकारी हिंमत जाधव, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल वडनेरे, उपनिरीक्षक किरण बर्गे, नाना अाखाडे, अार. जी. माळी, कताेरडमल, कच्छवा, मिलिंद साेनवणे, किरण बागुल, सी. एस. पाटील, माळी अादींनी भेट देऊन पाहणी केली. तसेच परिसरात काही पुरावा मिळताे का याची पाहणी केली. मात्र, काेणताही पुरावा अाढळून अाला नाही. याबाबत सचिनची अाई राेहिणी रमेश साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. घटनेनंतर पुलावर माेठ्या प्रमाणावर बघ्यांनी गर्दी केल्याने काही काळ वाहतूक काेंडी झाली हाेती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संपुर्ण खून नाट्य... का झाला असावा खून...
बातम्या आणखी आहेत...