आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबारमध्ये अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची हत्या; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपहरण करुन खून करण्यात आलेला राज नंदकिशोर ठाकरे. - Divya Marathi
अपहरण करुन खून करण्यात आलेला राज नंदकिशोर ठाकरे.
नंदुरबार- शहरातील डीआर हायस्कुलच्या अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्याने शहर हादरून गेले आहे. राज नंदकिशोर ठाकरे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. मारेकऱ्याचा शोध लावून अटक करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. 

या घटनेनंतर शहरात असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. दुपारी या मुलाचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. जिल्हा पोलीस प्रमुख राजेंद्र डहाळे यांच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. शुक्रवारी राज ठाकरे या नववीतल्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...