आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाने केला खून; देशशिरवाडे येथील घटना, दाेघांना केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपळनेर - मालमत्तेच्या वादातून उपसरपंच असलेल्या श्रीराम वसंत साेनवणे यांचा त्यांच्याच सख्ख्या भावाने चाकूचे निर्घृण वार करून खून केला. साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे ही घटना घडली. याप्रकरणी भावासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला.
 
घटनेनंतर नागरिकांनी पाेलिस ठाण्यासमाेर गर्दी केली. अाराेपींना अटक हाेत नाही ताेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. अाराेपींना अटक करण्याचे अाश्वासन मिळाल्यावर मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी दुपारी संशयित अाराेपी असलेला भाऊ सुधाकर साेनवणे त्याच्या मुलाला पाेलिसांनी अटक केली. 
 
देशशिरवाडे येथील उपसरपंच श्रीराम वसंत सोनवणे त्यांचा लहान भाऊ सुधाकर सोनवणे यांच्यात पूर्वी वाद होते. या वादाने बुधवारी टोक गाठले. श्रीराम सोनवणे सकाळी पावणेअाठ वाजता शेतात जाण्यासाठी मोटारसायकलीने निघाले. लगेच बसस्थानकाजवळून घरी परत आले. मुलगा दीपक कुटुंबीयांना म्हणाले की भाऊ सुधाकर बसस्थानकाजवळील ग्रामपंचायतीच्या गाळ्यांजवळ मला मारण्यासाठी चाकू घेऊन उभा आहे. त्यामुळे वडिलांसोबत मुलगा दीपक गौरव मोटारसायकलने बसस्थानकाकडे निघाले. तेव्हा सुधाकर वसंत सोनवणे याने भाऊ श्रीराम सोनवणे यांची मोटारसायकल अडवून वाद घातला. 
 
वाद विकोपाला गेला आणि सुधाकरने श्रीराम साेनवणे यांच्यावर चाकूने वार केले. ते जागेवरच जखमी होऊन कोसळले. छातीतून रक्तस्राव सुरू झाला. सुधाकरने घटनास्थळाहून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत श्रीराम सोनवणे यांना दीपक गौरव यांनी पिंपळनेर येथील डॉ. जितेंद्र चौरे यांच्याकडे दाखल केले. त्यांनी तपासणी केली. 

याप्रकरणी दीपक श्रीराम साेनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुधाकर वसंत साेनवणे, कुणाल सुधाकर साेनवणे (रा.देशशिरवाडे), देवेंद्र सुधाकर साेनवणे, ह.मु. सिल्वास (गुजरात), प्रतिभा मधुकर साेनवणे, हर्षल मधुकर साेनवणे (रा.देशशिरवाडे) राजेंद्र पंडित घरटे (रा.शेणपूर ता.साक्री), निवेदिता सुधाकर साेनवणे (रा. देशशिरवाडे) यांच्याविरुद्ध पिंपळनेर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक सुनील भाबड करीत अाहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...