आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार: अल्पवयीन मुलाने केला मित्राचा खून; सीसीटीव्ही कॅमेऱ्याने छडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार येथील राज ठाकरे याच्या खुनासाठी वापरण्यात आलेला चाकू घटनेनंतर चोरलेले दागिने. - Divya Marathi
नंदुरबार येथील राज ठाकरे याच्या खुनासाठी वापरण्यात आलेला चाकू घटनेनंतर चोरलेले दागिने.
नंदुरबार- येथील राज ठाकरे या विद्यार्थ्याच्या मारेकऱ्याला पकडण्यात पोलिसांना केवळ बारा तासांत यश आले आहे. राजचा रामपुरी चाकूने गळा चिरून त्याच्याच अल्पवयीन मित्राने खून केला. त्यानंतर त्याच्या खिशातील चावी घेत घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने रोख रक्कम लांबवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी चाकूसह इतर साहित्य जप्त केले असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. 

शहरातील डी.आर. हायस्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या राज नंदकिशोर ठाकरे (वय १५) हा शुक्रवारी (दि.७) बेपत्ता झाला होता. या प्रकरणी राजचे वडील नंदकिशोर ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांत नोंद झाली होती. त्यानंतर खामगाव रस्त्यावर राजचा मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर कोकणी समाजाच्या युवकांनी जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले होते. तसेच पालकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांची भेट घेतली होती. राजची सायकल डी.आर. हायस्कूलमध्ये तशीच पडली होती. त्यामुळे राज शाळेच्या प्रांगणात आला होता, हे तपासात सिद्ध झाले होते. पोलिसांनी त्याच्या मित्रांकडे विचारपूस केली असता राज स्कूटीवर बसून त्याच्या मित्रांसोबत गेल्याचे सांगण्यात आले. 

पोलिसांनी डी.आर. विद्यालय ते कोकणी हिल दरम्यानच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मागवले. या फुटेजमध्ये राज एका मोटारसायकलवर ट्रिपल सीट जाताना दिसून आला. पोलिसांनी राज सोबत असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पार्टी करण्याच्या हेतूने दोघांपैकी एकाने राजचा खून केल्याचे तपासात उघड झाले. अल्पवयीन मुलाने राजच्या पाठीत आधी रामपुरी चाकू खुपसला. त्यानंतर गळा चिरून निर्दयीपणे त्याची हत्या केली. तसेच राजच्या खिशातून चावी काढून दोघे राजच्या एकलव्य नगरातील घरात शिरले. कपाटातील ७१ हजारांचा सोन्याचा हार तसेच पाच हजार ५०० रुपये चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
 
मुलाच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नाही 

संबंधितअल्पवयीन मुलाने अतिशय थंड डोक्याने राज ठाकरेचा खून केला. या घटनेनंतर मारेकरी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर कुठलाच पश्चात्तापाचा भाव दिसत नव्हता. खून चोरी करून तो समाजात बिनधास्त वावरत होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळाले नसते तर पोलिसांना आरोपी हुडकून काढणे अधिक कठीण गेले असते. आरोपीला तत्काळ शोधून काढल्याने पोलिसांच्या विरोधात असलेला क्षोभ कमी होऊन त्यांचे कौतुक होत आहे. 

कारवाईची केली मागणी 
याघटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ. भरत वळवी यांच्या अध्यक्षतेखाली वासुदेव गांगुर्डे यांच्या उपस्थितीत याहामोगरा देवी मंदिराच्या सभागृहात कोकणी समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. बैठकीनंतर विभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांची भेट घेत राजकीय दबावाला बळी पडता दोषी अल्पवयीन मुलाला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी िशष्टमंडळाने केली. 
बातम्या आणखी आहेत...