आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुंचाळेत व्यसनी तरुणाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा - चुंचाळे येथे दारू पिऊन शिवीगाळ करत वाद घालणाऱ्या तरुणास घरच्या मंडळीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा अकस्मात मृत्यू नसून, खून असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे मयत तरुणाचे वडील, काका भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १५ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

नितीन मोरे (वय २५) हा दारू पिऊन त्याच्या आईला घरच्यांना शिवीगाळ करून त्रास द्यायचा. यावरून वाद उफाळून अाल्याने त्याला घरच्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. प्रारंभी मयताचे वडील वसंत मोरे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. िनतीनला लाथाबुक्क्यांनी मारण्यात आले होते, असे निष्पन्न झाले. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात स्वतः पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी फिर्यादी दिली. याप्रकरणी मयताचे वडील वसंत संतोष मोरे, भाऊ सचिन वसंत मोरे काका सुनील संतोष मोरे या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एपीआय रामकृष्ण पवार तपास करत आहेत.