आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामांकित संगीतकारांचा अाविष्कार हाेणार सादर, बालगंधर्व संगीत महाेत्सवाचे अायाेजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव ; स्व.वसंतरावचांदाेरकर प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व संगीत महाेत्सवाचे अायाेजन ते १० जानेवारी २०१६ दरम्यान करण्यात येणार अाहे. यंदाचा १४वा बालगंधर्व महाेत्सव हा बालगंधर्व खुले नाट्यगृहात संध्याकाळी ते १० वाजेदरम्यान हाेणार अाहे.
नामांकित कलावंतांचा नजराणा सादर हाेणार असल्याचे गुरुवारी प्रतिष्ठानतर्फे घेण्यात अालेल्या पत्रकार परिषदेत दीपक चांदाेरकर यांनी सांगितले. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पु.ग.अभ्यंकर, दत्ता साेमण, प्रा.शरदच्चंद्र छापेकर, एलअायसीचे (नाशिक) येथील अभय कुळकर्णी, केसरी टुर्सचे कपिल पाठक, दिनेश सुखात्मे, दीपिका चांदाेरकर, अरविंद देशपांडे उपस्थित हाेते.
यावर्षीही या महाेत्सवात राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय कलावंतांना निमंत्रित करण्यात अालेले अाहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कुंदाताई चांदाेरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून बालगंधर्व संगीत महाेत्सव समर्पित करण्यात येणार अाहे. जानेवारी राेजी प्रख्यात गायिका पंडिता कलापिनी काेमकली यांच्या सुश्राव्य गायनाने महोत्सवाची सुरुवात हाेईल. िद्वतीय सत्रात पुण्याचे प्रख्यात युवा संगीतकार पंडित सारंग कुळकर्णी यांच्या सराेद वादनाचा अाविष्कार रसिकांना मिळेल. प्रथमच इलेक्ट्राॅनिक सराेदचे फ्युजन प्रकार यात पाहायला मिळतील. राेजी प्रथम सत्रात अमेरिकास्थित फिनिक्स घराण्याचे पंडित मनू श्रीवास्तव यांचे गायन तर दुसऱ्या सत्रात नाशिक येथील प्रख्यात नृत्यांगना पंडिता रेखा नाडगाैडा त्यांची कन्या अादिती नाडगाैडा यांच्या युगल कथ्थक नृत्याचे सादरीकरण हाेईल.

‘संगीत स्वयंवरा’च्या शतक महाेत्सवानिमित्त कार्यक्रम
संगीतनाट्यपरंपरेतील ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाला १० डिसेंबर २०१५ राेजी १०० वर्षे पूर्ण हाेत अाहेत. त्यानिमित्ताने अागळावेगळा असा मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या गायन शैलीवर अाधारित ‘दिव्य संगीत रवी’ हा कार्यक्रम १० जानेवारी राेजी सादर हाेणार अाहे. पंडित भरत बलवल्ली याचे निरुपण करणार असून याने महाेत्सवाची सांगता हाेणार आहे. रसिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असेही परिषदेत सांगण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...