आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारासाठी गेलेल्या पतीचा मृतदेह पडला हाती, धरणगाव तालुक्यातील व्यक्तीच्या मृत्यूचे गूढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सोनवद येथील प्रौढ व्यक्ती उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात गेली. त्यानंतर ते परतल्याने त्यांच्या पत्नीने संबंधित रुग्णालयात धाव घेतली. मात्र, त्यांना जळगावला हलविल्याचे सांगण्यात आले. तर जळगाव येथे त्यांचा पत्ताच लागला नाही. तर शोधा-शोध केल्यानंतर त्यांचा मृतदेहच हाती आल्याने त्यांच्या पत्नीचे पायाखालील जमिनच सरकली.
धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील प्रौढ व्यक्ती आसाराम सखाराम डोळे (वय ५०) प्रकृती खराब असल्याने उपचारासाठी शनिवारी सकाळी ते सोनवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित वानखेडे यांनी प्रौढास दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. त्यानंतर दुपारी वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात आसाराम डोळे यांचा साधा केस पेपरही काढण्यात आला. मात्र, आसाराम डोळे हे रुग्णालयात भरती झालेच नाहीत, त्यानंतर ते जिल्हा रुग्णालयातून गायब होते.
दरम्यान, सायंकाळी वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांना शाहूनगरमधील पोलिस लाइनमागे एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी शाहूनगरमधील पोलिस हौसिंग सोसायटीच्या सेंटर क्रमांक १२, रूम नं.१च्या भिंतीमागे एका ५० वर्षीय व्यक्ती पडलेला आढळून आला. त्यांना सायंकाळी ६.३० वाजता जिल्हापेठ पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता मुंडे यांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, सायंकाळी त्यांची पत्नी चौकशीसाठी सिव्हिलमध्ये आली. मात्र, त्या ठिकाणी त्यांचा पती सापडलाच नाही. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता पतीच्या मृतदेह पाहिल्यानंतर मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पत्नीची शोधा-शोध
सोनवदयेथील आसाराम सखाराम डोळे हे उपचार घेऊन परत का आले नाहीत? हे पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी कल्पना आसाराम डोळे या सोनवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या. मात्र, आसाराम डोळे यांना सिव्हिलमध्ये हलवल्याचे समजले. त्यांनी दुपारी वाजता तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल गाठले. आसाराम यांची दुपारी वाजता सिव्हिलमधील साध्या रजिस्टरमध्ये नोंद होती. मात्र, कोणत्याही वॉर्डात ते दाखल नव्हते. त्यानंतर त्यांनी पतीची शोधा-शोध सुरू केली. सायंकाळी वाजता पोलिसांनी त्यांना तुमच्या पतीचा मृतदेह सापडल्याचे सांगितले. मात्र, त्याच्यावर सुरुवातीला त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता मृतदेह पाहून त्यांचे अवसानच गळाले. कारण, घरात कमवता एकच पुरुष त्यातच तीन लहान मुलींची जबाबदारी, यामुळे कल्पना यांचे डोक सुन्न झाले हाेते. काय करावे? हेच त्यांना कळत नव्हते.

माझा पती मेलाच कसा?
शनिवारी सकाळी थोडासा ताप आला म्हणून उपचारासाठी माझे पती सरकारी दवाखान्यात गेले होते. त्यानंतर त्यांचा काहीच निरोप आला नाही, म्हणून तपास केला; तर सायंकाळी पतीचा मृतदेहच पहायला मिळाला. चांगला असलेला माझा पती मेलाच कसा?
- कल्पना डोळे, मृतआसाराम यांची पत्नी
मृत्यूचे कारण सांगणे कठिण
सोनवद येथील आसाराम डोळे यांचा मृतदेह सायंकाळी ६.३० वाजता पोलिसांनी आणला. मात्र, त्यांचे शवविच्छेदन झाले नसल्याने मृत्यूचे कारण आता सांगता येणे शक्य नाही.
-डॉ. स्मिता मुंडे, अपत्कालीन वैद्यकीय अधिकारी
बातम्या आणखी आहेत...