आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाभिक समाजाच्या मेळाव्यात पाकीट मारणाऱ्या चाेराची धुलाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नाभिक समाजाचा वधू-वर परिचय मेळावा साेमवारी सरदार वल्लभभाई पटेल, लेवा भवन येथे अायाेजित करण्यात अाला हाेता. मेळाव्यातील प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन चाेरटे भवनात घुसले. त्यातील एक चाेरटा एका व्यक्तीचे पाकीट मारून पळण्याच्या तयारीत असताना नागरिकांनी त्याला पकडून चाेप देत जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात दिला. या गाेंधळाचा फायदा घेत त्याचे इतर साथीदार पसार हाेण्यात यशस्वी झाले. दरम्यान, मेळाव्यात एका महिलेचे हजार रुपये चाेरी झाल्याचे समाेर अाले अाहे. 
 
नाभिक समाजाचा साेमवारी उत्तर महाराष्ट्रस्तरीय वधू-वर परिचय मेळावा असल्याने पाच जिल्ह्यांतील नाभिक समाजबांधव एकत्र अालेले हाेते. त्यामुळे लेवा भवनात साेमवारी सकाळपासूनच गर्दी हाेती. या गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारण्यासाठी चार ते पाच चाेरट्यांची टाेळी साेमवारी सकाळी ११ वाजता सभागृहात घुसली.
 
दुपारी १२ वाजता मेळाव्यात चाेरटा एका नागरिकाच्या खिशातून पाकिट काढत असल्यााचे काही जणांनी पाहिले. त्या चाेरट्याला हटकल्यानंतर ताे सभागृहाच्या बाहेर पळून जात असताना त्याला नागरिकांनी पकडून चाेप दिला. त्या वेळी त्याने चाेरी करण्यासाठी नाही, तर जेवण करण्यासाठी अाल्याचा बहाणा केला. चाेरट्याला जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे छगन तायडे यांच्या ताब्यात दिले. त्याची चाैकशी केली असता त्याने त्याचे नाव शेेख शहजाद शेख अजगर (वय १८, रा. भुसावळ) असे सांगितले.
 
पाेलिसांच्या चाैकशीदरम्यान त्याने चाेरी करण्यासाठीच अाला असल्याचे सांगितले. मात्र, चाेरी केली नसल्याचे त्याने पाेलिसांना चाैकशीदरम्यान सांगितले. त्याच्यासाेबत अाणखीन तीन-चार साथीदार हाेते.
 
महिलेचे 1 हजार लांबविले :
मेळाव्यातएका महिलेचे हजार रुपये लांबविल्याचे समाेर अाले. मात्र, शेख शहजादच्या खिशात फक्त ३५० रुपये हाेते. त्यामुळे महिलेच्या पर्समधून त्याच्या इतर साथीदारांपैकी काेणीतरी चाेरी केल्याचा पाेलिसांना संशय अाहे. शेख शहजादवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अाली. 
 
चाेरी करण्यासाठी जळगावात खाेली : नाभिक समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात चाेरी करताना सापडलेला शहजाद शेख हा मूळचा भुसावळ येथील अाहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्याने शिवाजीनगर परिसरात एक खाेली भाड्याने घेऊन ताे पत्नी साेबत राहत हाेता. मात्र, पाेलिसांच्या नजरेत अाल्याने काही दिवसांपूर्वीच त्याने जळगाव शहर साेडून पुन्हा भुसावळ येथे राहण्यासाठी गेल्याचे पाेलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाले. ताे सराईत गुन्हेगार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...