आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२८ ग्रामपंचायतींची जिल्हास्तर तपासणी, ग्रामीण भागातून मिळतोय प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राज्यभरात सुरू असलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे आता चळवळीत रूपांतर झाले आहे. तालुकास्तरावर झालेल्या तपासणीत ४२ ग्रामपंचायतींची जिल्हास्तरावर तपासणीसाठी निवड झाली आहे. प्रथम द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या २८ ग्रामपंचायतींची तपासणी होणार आहे. जिल्हास्तर पाहणीसाठी आठवडाभरात सांगलीहून समिती येणार अाहे.

बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात. हे लक्षात घेऊन शासनाने सन २०००-२००१ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात स्वच्छता अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्न, काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, मानवी मलमूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात चांगले काम करून ग्रामविकासाचा पाया मजबूत होत आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत या योजनेचे नियंत्रण केले जाते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१४-२०१५ या वर्षात प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय तृतीय ग्रामपंचायतींना गुणदान करून त्यांची निवड जिल्हास्तरावरील तपासणीसाठी करण्यात आली आहे. तालुकास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीत सर्वाधिक ९२ गुण हिवरेबाजार ग्रामपंचायतीला आहेत. त्याखालोखाल नेवासे तालुक्यातील गोगलगाव ग्रामपंचायतीला ९१ गुण आहेत. परंतु जिल्हास्तरावर प्रथम द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींचीच तपासणी केली जाईल. ग्रामस्वच्छता अभियानाबरोबरच शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास सुधारणा अभियानही राबवण्यात येत आहे. या अभियानासाठीही तालुकास्तरावरून निवड झालेल्या पहिल्या दोन याप्रमाणे २८ ग्रामपंचायतींची निवड जिल्हास्तर तपासणीसाठी करण्यात आली आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात निवडलेल्या काही ग्रामपंचायतींची दलित वस्ती विकास सुधारणा अभियानातही निवड झाली आहे. त्यात अकोले तालुक्यातील धुमाळवाडी, घारी (कोपरगाव) कांबी (शेवगाव), शिऊर (जामखेड), टाकळी खंडेश्वरी (कर्जत) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दोन्ही अभियानात प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींची तपासणी होणार आहे. यासाठी आठ दिवसांत समिती तपासणी करणार आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर ठसा उमटवला आहे.

असे आहेत पुरस्कार
तालुकास्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीयसाठी १० हजार, जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक लाख, द्वितीय लाख तर तृतीय लाख, विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक १० लाख, द्वितीय लाख तर तृतीय क्रमांकासाठी लाख, राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ लाख, द्वितीय १५ लाख, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला १० लाखांचा पुरस्कार दिला जातो.

समितीत सांगली जि. प. अध्यक्ष, अिधकारी, पत्रकार
जिल्हास्तर तपासणीसाठी सांगलीची समिती येणार आहे. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, पत्रकार आदींचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती प्रथम द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींची पाहणी करणार आहे. त्यातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवड होईल.
बातम्या आणखी आहेत...