आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagar School Building Fraud Two Engineer Suspend

शाळा दुरुस्ती अपहारप्रकरणी दोन जि. प. अभियंते निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव येथील जि. प. शाळा दुरुस्तीत झालेल्या अपहारप्रकरणी शाखा अभियंता आर. जी. पानसंबळ व प्रभारी उपअभियंता एस. ए. पोवार यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी निलंबित केले.

शाळेच्या 13 वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी 24 फेब्रुवारी 2011 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. मात्र, हे काम अवघ्या एक महिन्यात पूर्ण करून त्यासाठी 9 लाख 15 हजार 393 रुपये खर्च दाखवण्यात आला. वास्तविक या कामावर अवघे 49 हजार 838 रुपये खर्च झाले. प्रशासनाने उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. चौकशी अहवालात दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता पी. पी. खंडागळे, शाखा अभियंता आर. जी. पानसंबळ, प्रभारी उपअभियंता एस. ए. पोवार यांना दोषी ठरवले गेले. अपहार झालेल्या रकमेचा भरणा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश अग्रवाल यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांना दिले होते. खंडागळे यांच्यावरील आरोपपत्र शासनाला सादर करण्यात आले आहे. अपहाराची गंभीर दखल घेत अग्रवाल यांनी सोमवारी (17 जून) सायंकाळी पानसंबळ व पोवार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.