आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nageshwar Kolanita Ratrituna Two Places Burglary

नागेश्वर कॉलनीत रात्रीतून दोन ठिकाणी घरफोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-नागेश्वर कॉलनीतील देवाशिष कुंडू आणि राकेश गावंडे घर बंद करून बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत शुक्रवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या बंगल्यात चोरी करून 4 लाख 31 हजारांचा ऐवज लंपास केला.

कुंडू आणि गावंडे कुटुंबीय शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास बाहेरगावी गेले होते. शनिवारी सकाळी 7 वाजता शेजार्‍यांना त्यांच्या बंद दरवाजांचे कुलूप तोडलेले दिसल्याने चोरी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. मुख्य दरवाजाचे कुलूप टॉमीच्या साहाय्याने तोडून घरातील कपाट, किचनमधील भांडी, कॉट सर्वच ठिकणी झाडाझडती करून चोरट्यांनी हात साफ केला आहे. दोन्ही घरात झालेल्या चोरीत 4 लाख 31 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

कुंडूच्या घरातून 3 लाख 81 हजारांची चोरी

देवाशिष कुंडू हे जैन इरिगेशनमध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास कुंडू आणि त्यांच्या प}ी स्निग्धा भुसावळला गेले होते . तेथून रेल्वेने कुंडू हे मुंबईला गेले. त्यांना शनिवारी सकाळी इस्त्राईल येथे जायचे होते. कुंडू यांना भुसावळ सोडल्यानंतर स्निग्धा ह्या भुसावळातच वडिलांकडे थांबल्या. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक आयुक्त ए.के. बोस हे स्निग्धा यांचे वडील आहेत. शनिवारी सकाळी त्यांच्या घरी चोरी झाल्याचे शेजारच्यांनी कळविल्याने सर्वजण जळगावी परतले. त्यांच्या घरातून 167 ग्रॅम सोन्याचे दागिने, 200 ग्रॅम वजनाची चांदीची मूर्ती, एलजी कंपनीचा डीव्हीडी, सॅमसंग कंपनीचा एलईडी, ताशीबा कंपनीचा एलईडी, फास्टट्रॅक कंपनीचे 10 गॉगल आणि एअर कंपनीच्या दोन बॅग, असा एकूण 3 लाख 81 हजारांचा ऐवज चोरी झाला आहे.

अंत्यसंस्कारसाठी गेले होते गावंडे

राकेश प्रभाकर गावंडे हे ‘निमजाई कृपा’ या बंगल्यात राहतात. चिंतन ट्रान्सपोर्टचे ते मालक आहेत. गावंडे यांच्या प}ी राही यांच्या आजोबांचे शुक्रवारी रात्री 7.30 वाजता औरंगाबाद येथे निधन झाले. त्यामुळे हे दाम्पत्य रात्री 8 वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथे निघून गेले. रात्री त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील दोन खोल्यांमधील कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून चोरट्यांनी घराची झडती घेतली. यात लॅपटॉप, व्हिडिओ कॅमेरा आणि गॅस सिलिंडर चोरीस गेले. गावंडे यांच्या घरातून 50 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.

गजबजलेल्या चौकात बंगले

महाबळकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला 50 फुटांवर हे बंगले आहेत. नागेश्वर कॉलनी याच बंगल्यापासून सुरू होते. या ठिकाणाहून रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. गजबजलेल्या चौकातील बंगले चोरट्यांनी लक्ष केल्याचे या घटनेतून निदर्शनास येते.