जळगाव- रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमधील नववीच्या विद्यार्थ्यांनी नागपंचमीनिमित्त एसटी बसस्थानकात ‘सर्प वाचवा’ हे पथनाट्यातून नागरिकांचे प्रबोधन केले. ‘स्वत: आनंदाने जगा आणि जगू द्या’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी सापांना मारू नका, त्यांना त्रास देऊ नका हे सांगत वैज्ञानिक दृष्टीकोनातून सापांचे महत्त्व विषद केले. माणूस आपल्या फायद्यासाठी जनावरांची वस्ती उद्ध्वस्त करत आहे. ही जनावरे दिसली की, त्यावर आक्रमण करत आहे. माणसांनी हे थांबवायला हवे, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. कार्यक्रमास मुख्याध्यापक विराफ पेसूना, मिलन साळवी, अर्चना उजागरे उपस्थित होते.
पलोड शाळेत विद्यार्थ्यांना दिली माहिती
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये अंनिस, सामाजिक वनीकरण विभाग आणि शाळेच्या हरित सेनेतर्फे विद्यार्थ्यांना सर्पाविषयी माहिती देऊन त्यांना चित्रफीत दाखवण्यात आली. शुभदा नेवे, डी. एस.कट्यारे, सर्पमित्र विवेक देसाई यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य सुहास मुळे, सामाजिक वनीकरणाचे पी.डी.कलाल, एस.टी.इंगळे उपस्थित होते. यासाठी उपप्राचार्य जयंत टंभरे, योगेश पाटील, भावेशा धनगर, दीपक आहुजा, अंनिसचे विश्वजित चौधरी यांचे सहकार्य मिळाले.