आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर-पुणे एसी साप्ताहिक गाडी मंगळवारी धावणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नागपूर-पुणे दरम्यान एसी साप्ताहिक रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. (०२१२४) एसी साप्ताहिक रेल्वे ते २१ जानेवारी या काळात दर मंगळवारी नागपूरहून सुटेल. तर (०२१२३) एसी साप्ताहिक ते २७ जानेवारी या काळात दर बुधवारी पुणे येथून सुटणार आहे. या गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव दौंड या स्थानकांवर थांबा आहे.

नागपूर-अमृतसर एसी : (०२१२५)साप्ताहिक एसी रेल्वे ते ३१ जानेवारी या काळात दर शनिवारी नागपूर येथून सुटेल. तर (०२१२६) ही साप्ताहिक रेल्वे ११ जानेवारी ते फेब्रुवारीला दर सोमवारी अमृतसर येथून सुटणार आहे. या गाड्यांना भोपाळ, झांशी, ग्वालियर, आग्रा कॅण्ट, नवी दिल्ली, अंबाला, लुधियाना आणि जालंधर या स्थानकांवर थांबा आहे.

सीएसटी-गोरखपूर सुपरफास्ट : प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता, सीएसटी ते गोरखपूर या मार्गावर चार साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वे धावणार आहेत. (०२५९७) ही गाडी आणि १६ जानेवारीला गोरखपूरहून सुटेल. तर (०२५९८) ही गाडी १० आणि १७ जानेवारीला सीएसटीहून सुटणार आहे. या गाड्यांना खलिलाबाद, बस्ती, गोंडा, लखनऊ, कानपूर सेंट्रल, झांशी, हबीबगंज, इटारसी, भुसावळ, कल्याण या स्थानकांवर थांबा आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते.

नागपूरसाठी पॅसेंजर नाही
भुसावळ जंक्शन स्थानकावरून संध्याकाळी सुटणारी नागपूर पॅसेंजर फक्त बडनेऱ्यापर्यंत जाईल. तसेच सकाळी सुटणारी नरखेड पॅसेंजर ते जानेवारीपर्यंत रेल्वे प्रशासनाने रद्द केल्यामुळे प्रवाशांचे माेठ्या प्रमाणावर हाल हाेत अाहे. रेल्वेमार्ग दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने या गाड्या रद्दचा निर्णय घेतला अाहे. परिणामी अाता फक्त दुपारच्या २.५५ वाजेच्या वर्धा पॅसेंजरचा प्रवाशांना अाधार अाहे. हिवाळ्यात रेल्वे रूळ अाकुंचन पावत असल्याने रुळांना तडे पडण्याचे प्रकार हाेतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे रूळ देखभालीचे काम युद्धपातळीवर सुरू अाहे. थेट नागपूरसाठी एकही पॅसेंजर नसल्याने हाल हाेत अाहेत.

पुणे-निझामुद्दीन ३१ मार्चपर्यंत : रेल्वेप्रशासनाने, पुणे-हजरत निझामुद्दीन (एसी) विशेष साप्ताहिक गाडीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (०४४१७) ही साप्ताहिक गाडी पुणे येथून दर रविवारी निघते. तर (०४४१८) ही गाडी दर शुक्रवारी हजरत निझामुद्दीन येथून धावते. या गाड्यांना लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, बडोदा, रतलाम स्थानकांवर थांबा आहे.

पुणे-जबलपूर गाडी
पुणे-जबलपूर विशेष रेल्वेगाडीला २९ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (०१६५५) पुणे-जबलपूर आणि (०१६५६)जबलपूर-पुणे या गाड्यांना मुदतवाढ मिळाली आहे. या गाड्यांना दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महल या स्थानकांवर थांबा आहे.

व्यावसायिकांची साेय हाेणार : हिवाळीपर्यटन, लग्नसराई, शैक्षणिक, व्यावसायिक कामासाठी पुण्याकडे जाण्याऱ्या प्रवशाांना नागपूर-पुणे या साप्ताहिक गाडीमुळे अाता दिलासा मिळणार असल्याचे संकेत अाहेत.