आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीवर ठाेकला बाेर्ड, पाणीपुरवठ्यात पडला खंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विदगाव पुलावरून जडवाहनांना बंदी असल्याचा फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने ममुराबाद रेल्वे पुलाच्या पुढे लावला, त्या ठिकाणी जमिनीखाली चक्क महापालिकेची जलवाहिनी हाेती. या जलवाहिनीच्या पाइपला माेठा तडा पडल्याने प्रजापतनगरासह परिसरात पुरेसा पाणीपुरवठा हाेऊ शकला नाही.

विदगाव जवळील तापी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे १७ एप्रिलपासून या पुलावरून दुचाकी व्यतिरिक्त अन्य वाहनांना प्रवेश नसल्याचे जाहीर करण्यात आले हाेते. तशी सूचना या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना व्हावी, या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम िवभागाने रस्त्याच्या डाव्या बाजूला माेठा फलक लावला. परंतु ज्या ठिकाणी ताे फलक कांॅक्रीट टाकून गाडला त्याच्या खाली प्रजापतनगर, साेनारनगर परिसराला पाणीपुरवठा करणारी २०० मिमीची पीयूसी पाइपलाइन हाेती. पाइपावरच खाेदकाम झाल्याने ितला तडा गेला. त्यामुळे गुरुवारी या भागात अतिशय कमी दाबाने पुरवठा झाला. अनेक घरांना तर पाणीच मिळाले नाही. शाखा अभियंता सुनील तायडे यांनी तातडीने दुरुस्तीचे काम करवून घेतल्याने माेठी गैरसाेय दूर झाली.