आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य नाट्य स्पर्धेत ‘नाना भाेळे’ तृतीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जळगावच्या ‘नाना भाेळे- १२, शनिपेठ’ या नाटकाने बाजी मारत तृतीय क्रमांक पटकावला. मू.जे.महाविद्यालय निर्मित हेमंत कुळकर्णी दिग्दर्शित या नाटकास लाख रुपयांचे तृतीय पारिताेषिक मिळाले अाहे. गेल्या ५५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीतील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये जळगावला स्थान मिळाले अाहे. त्याचबराेबर हेमंत कुळकर्णी यांना दिग्दर्शनाचे तृतीय पारिताेषिक ३० हजार रुपये राेख अाणि अभियानाचे राैप्यपदक हेमंत पाटील अपूर्वा कुळकर्णी यांना मिळाले असून, प्रत्येकी १० हजार रुपये राेख मिळाले अाहेत. नाटकात २२ जणांचा चमू हाेता. मू.जे.च्या नाट्यशास्त्र विभागाची ही निर्मिती अाहे.

विद्यार्थी प्रगल्भ झालेत : या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मुंबई महानगरपालिकेच्या ‘असुरवेद’ नाटकास, तर द्वितीय पारिताेषिक सांगलीच्या ‘वृंदावन’ नाटकास मिळाले. जळगावच्या नाटकाला तृतीय क्रमांक मिळणे ही अभिमानाची गाेष्ट अाहे. अाज ३० वर्षांपासून मी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी हाेत असून, विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाल्याचा अानंद अाहे. या पुरस्कारामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने प्रगल्भ झाल्याचे जाणवतेय, अशी प्रतिक्रिया नाटकाचे दिग्दर्शक हेमंत कुळकर्णी यांनी दिली.