आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांत पूर्ण हाेणार नाना-नानी पार्क, अतुल जैन यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्यासहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या काव्यरत्नावली चाैकातील नाना-नानी पार्कच्या कामाला प्रत्यक्षात मंगळवारपासून सुरुवात हाेत अाहे. अनेक वैशिष्ट्यांनी अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण अशा पद्मश्री डाॅ. भवरलाल जैन थीम पार्कचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा मानस जैन उद्याेग समूहाचे संचालक अतुल जैन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दत्त जयंतीच्या निमित्ताने १३ राेजी सकाळी ९.४५ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम अायाेजित करण्यात अाला अाहे.
काव्यरत्नावली चाैकालगतच्या जागेत अाहे ती सर्व निसर्गसंपदा सांभाळून हे थीमपार्क साकारण्यात येणार अाहे. हे पार्क सर्वांसाठी खुले राहणार असून परिवारातील सर्व वयाेगटातील सदस्यांचे मनाेरंजन हाेईल, अशी संपूर्ण व्यवस्था पार्कमध्ये करण्यात येणार अाहे. संपूर्ण शहरातून या पार्कमध्ये नागरिक येणार असल्याने वाहनांच्या पार्किंगसाठी पाेलिस अधीक्षकांच्या बंगल्याशेजारील जागेत व्यवस्था करण्यात येणार अाहे. पार्कचा अाराखडा तयार करणाऱ्या अार्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी पार्कमध्ये असलेल्या सुविधांची व्यवस्थांची माहिती दिली.
महापाैर नितीन लढ्ढा यांनी हे थीम पार्क नसून ड्रीम पार्क असल्याचे सांगितले. गेल्या ३० वर्षांनंतर शहरात नवीन पार्कच्या निर्मितीला सुरुवात हाेणार अाहे. यापूर्वी सन १९८५-९०मध्ये बहिणाबाई उद्यानाची निर्मिती झाल्याची अाठवण त्यांनी करून दिली. मनपाची अार्थिक परिस्थिती नसल्याने पार्कच्या देखभाल दुरुस्तीची तयारी जैन उद्याेग समूहाने दाखवली अाहे. यासाेबत गांधी उद्यानाचा विकास टाॅवरचे सुशाेभिकरणदेखील करण्यात येणार असल्याचे लढ्ढा यांनी सांगितले. या वेळी माजी स्थायी समिती सभापती नितीन बरडे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...