आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव विद्यापीठातील पंकजकुमार नन्नवरे यांनीही दिला राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेर्शाम यांच्या कथित अपमानास्पद वागणुकीमुळे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा. पंकजकुमार नन्नवरे दुखावले असून गुरुवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कुलगुरू रजेवर असल्याने संबंधित यंत्रणेने तो त्यांच्याकडे परत पाठवला.

गेल्या महिन्यात पीआरओ सुनील पाटील यांनी दिलेला राजीनामा गाजला होता. त्यानंतर गुरुवारी( 9 मे ) प्रा.नन्नवरे यांनी संचालकपदाचा राजीनामा लिहिला. ते गुरुवारी विद्यार्थी कल्याण विभागाच्या एका उपक्रमासंदर्भातील फाइल कुलगुरूंकडे घेऊन गेले होते. मात्र, कुलगुरू डॉ.मेर्शाम हे अन्य कामात व्यस्त असल्यामुळे आणि त्यांना सुटीवर जायचे असल्यामुळे त्यांनी ती फाइल आपल्या अंगावर भिरकावली, असे प्रा. नन्नवरे यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही नन्नवरे यांना कुलगुरूंकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. आपले राजीनामापत्र आवक रजिस्टरमध्ये नोंदवून घ्यावे, असा प्रय}ही त्यांनी केला. मात्र संबंधित कर्मचार्‍यांनी तो नोंदवून घेतला नाही. आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे प्रा. नन्नवरे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. राजीनाम्याबाबत बोलायला मात्र त्यांनी नकार दिला.