आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदणीतील गळणारा वाॅल एका रात्रीत बंद, तीन महिन्यांपासून होती गळती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी गुरुवारी टाकळी ते सोलापूर जलवाहिनीवरच्या नांदणी येथील बीपीटीस भेट दिली. तेथे पाहणी केली असता बीपीटीजवळ गळती असल्याचे निष्पन्न झाले असून गळती त्वरित बंद करावी, असा आदेश त्यांनी उपअभियंता महिबूब जमादार, अविनाश कामत यांना दिला. त्यानंतर मागील तीन महिन्यांपासून अविरत गळणारा वॉल एका रात्रीत बंद झाला, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी ते सोलापूर जलवाहिनीवर नांदणी बीपीटीजवळ वाॅलला गळती असल्याचे निदर्शनाला आले.या प्रकरणी दिव्य मराठीने प्रकाश टाकला.दरम्यान, जलवाहिनी फुटू नये याकरता एअर वाॅलमध्ये गळती होते, असे मनपा अधिकारी सांगत होते. मात्र, मनपा अधिकाऱ्यांनी गुरुवारी भेट दिली असता तेथील गळती बंद झाल्याचे दिसून आले. दरम्यान, मनपा अधिकाऱ्यांनी म्हणणे बदलले, हवा गेल्यावर गळती होत नाही असे सांगितले.

हीगळती अधिकाऱ्यांना दिसली कशी नाही? : मागीलतीन महिन्यांपूर्वी नांदणीजवळ मुख्य जलवाहिनीवर नवीन बीपीटी बसवण्यात आला. हे काम करताना जुन्या बीपीटीवरची गळती महापालिका अधिकाऱ्यांना दिसली कशी नाही, असा प्रश्न आहे. शिवाय जलवाहिनीच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना गळती लक्षात येणे अावश्यक होते. अविरत वाहणारे तीन इंची पाणी बंद करण्याचे प्रयत्न का झाले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो.
नांदणीजवळील वॉलची गळती गुरुवारी बंद झाली होती.

अधिकाऱ्यांकडून केली पाहणी
प्रभारी नगर अभियंता दुलंगे यांनी बीपीटीजवळच्या गळतीची पाहणी केली. मुख्य गळती पाहून जुन्या बीपीटीवर चढून परिसराची पाहणी केली. पाण्याची गळती होऊ नये याकरता तत्काळ उपायोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यावेळी उपअभियंता मुजावर कामत उपस्थित होते.

गळती बंद करू
महापालिकेच्याजलवाहिनीलागळती असल्याने ती बंद झाली पाहिजे. ती गळती बंद करण्यात येईल. एअर वाॅलला बाॅक्स करून बसवण्यात येईल. गंगाधर दुलंगे, प्रभारीसार्वजनिक आरोग्य अभियंता, मनपा