आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची टेम्पोला धडक; पाच महिला ठार, आठ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहादा - शेतातून घरी परतणाऱ्या मजुरांच्या टेम्पोला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच महिला मजूर ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले. शहादा शहरापासून दोन किलाेमीटर अंतरावर शनिवारी हा अपघात घडला.मृतांमध्ये आशाबाई छोटू मालचे, अनिता फका पवार, जतीबाई झिंगा पवार, लक्ष्मीबाई भाऊराव ठाकरे, रमाबाई खंडू सोनवणे (सर्व रा. मामाचे मोहिदा, ता.शहादा) यांचा समावेश आहे. जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. शहदा परिसरातून काम आटोपून सर्व कामगार टेम्पोने घरी जात होते. या वेळी शिरपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिल्याने टेम्पो सुमारे २०० ते ३०० फुटांपर्यंत फरफटत गेला. यात पाच जण जागीच ठार झाले, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या टेम्पोत १३ मजूर बसले होते. यातील जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेनंतर ट्रकचालक
फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत
घटनास्थळी पोलिस निरीक्षक संजय महाजन, सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह तत्काळ दाखल होऊन रहदारी सुरळीत केली. शहादा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर फोटोंमधून पाहा, अपघाताची भीषणता..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...