आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्याच्या मुलाने ऐशआरामासाठी केली हत्या, CCTVने 24 तासांत सापडले आरोपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज नंदकिशोर ठाकरे या नववीतील विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. - Divya Marathi
राज नंदकिशोर ठाकरे या नववीतील विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली.
नंदुरबार- शहरातील डीआर हायस्कुलच्या अपहरण झालेल्या राज ठाकरे या 15 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याने शहर हादरून गेले होते. त्यानंतर नागरिकांना दुसरा धक्का हल्लेखोराची ओळख पटल्यानंतर बसला आहे. जिल्हा परिषद सभापतीच्या सुपूत्राने राज ठाकरे या विद्यार्थ्याला पैशांसाठी मारले असल्याचे समोर आले आहे. 
 
असा सापडला आरोपी
- पोलिसांनी या प्रकरणती तत्परता दाखवत आरोपींचा शोध घेतला. शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात दोन मुले राज ठाकरेला बाहेर बोलवत असल्याचे दिसले.
- पोलिसांनी या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी हा काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषदचे सभापती दत्तू चौरे यांचा मुलगा आहे. आरोपी 18 वर्षांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले असून दुसरा आरोपी अल्पवयीन आहे.
 
मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी दिला होता नकार
- राज नंदकिशोर ठाकरे या अल्पवयीन मुलाचा शनिवारी दुपारी मृतदेह आढळून आल्यानंतर शहरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मारेकऱ्यांचा शोध लागत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. 
- जिल्हा पोलिस प्रमुख राजेंद्र डहाळे यांच्या लेखी आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्याआधी शनिवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. 
 
काय आहे प्रकरण 
- शहरातील डीआर हायस्कूलमध्ये नववीत शिकत असलेला राज नंदकिशोर ठाकरे या विद्यार्थ्याचे शुक्रवारी अपहरण करण्यात आले होते.
- शनिवारी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. 
बातम्या आणखी आहेत...