आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nandurbar Zilha Parishad's Two Member Susupended

नंदुरबार जि.प.तील दाेघांचे निलंबन,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - मार्चअखेर ऑनलाइन रक्कम काढल्याने १३ कोटी ३९ लाख रुपयांची रक्कम शासनाकडे परत गेल्याने जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून तत्काळ निलंबित करण्यात आले. तसेच लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्याची शिफारसही जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. व्ही. गमे यांनी वरिष्ठांकडे केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्यांसह चौघांना नोटीस बजावली आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाला ३१ मार्च रोजी टप्प्याटप्प्याने सहा वेळा १३ कोटी ३८ लाख ६८ हजार २०६ रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अर्थसंकल्प अंदाज वितरण संनियंत्रण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला हाेता; परंतु हा निधी ऑनलाइन विड्रॉवल करण्यात आला नाही. कार्यप्रणालीबाबत लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा वित्त अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या संपर्कात राहून निधी विड्रॉवलबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठ सहायक लेखाधिकारी पी. बी. कलाल सहायक लेखाधिकारी एस. जे. गवारे या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चितकरून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. तसेच लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या बाबतीत निलंबनाची शिफारस करण्यात आली असून, अन्य चार जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. व्यपगत झालेली रक्कम पुन्हा मिळावी, याबाबतीत शासनस्तरावर बोलणी झाल्याने ती रक्कम मिळण्याची आशा आहे. यात पाच काेटी रुपयांची मोठी कामे, कोटी ६६ लाखांची लघु पाटबंधाऱ्याची तर कोटी १६ लक्ष ९० हजारांची कामे सन २०१६-१७ मध्ये करण्यात येणार होती.