आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबारची कुमुदिनी बनली युरोपची सून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा रंगला. हा विवाह सोहळा नेहमीपेक्षा वेगळा होता. कारण या साेहळ्याचा वर होता युरोपीय देशातला. त्यामुळे या सोहळयात आलेल्या प्रत्येकाच्या नजरा त्या विदेशी वराकडे राेखल्या होत्या. वराचे पिता माता भारतीय वैदिक पद्धतीतील लग्न अनुभवत होती. त्यांना हिंदी भाषा कळत नव्हती; परंतु केवळ चेहऱ्यातील भावनेतून ते वऱ्हाडींच्या भावना जाणत होते.

शहरातील स्टेट बँकेत सेवारत असलेले राजीव शिरसाळे यांच्या कन्या कुमुदिनी या पुण्यातील रेडहॅट कंपनीत नोकरीला आहेत. याच कंपनीत युरोपात नोकरी करीत असलेल्या मार्सेेल याच्याशी इंटरनेटद्वारे दररोज संवाद होऊ लागला. मार्सेल कुमुदिनी यांचे विचार जुळत गेले. कंपनीतील सहकारी असूनही त्यांच्यातील मैत्रीचे बंधन अधिक घट्ट होत गेले. अचानक मार्सेलने कुमुदिनीशी विवाहाचा प्रस्ताव दिला; परंतु कुमुदिनीने आई-वडिलांना विचारूनच निर्णय घेईन, असे उत्तर दिले. मार्सेलने कुमुदिनीचे वडील राजीव आई रजनी यांच्याशी भेट घेतली. तसेच कुमुदिनी मला आवडते, असे सांगितले. आई-वडिलांनी या लग्नाच्या प्रस्तावास हिरवा कंदील दर्शवला. अखेर १३ जुलैच्या सायंकाळी शुभमंगल करण्याचे ठरले. बुधवारी सकाळपासून भारतीय वैदिक पद्धतीने विवाह करण्यात आला. सायंकाळी मोठ्या थाटात लग्न सोहळा पार पडला.मार्सेलचे वडील झेडनेक गोरनोव्हा हे झेक रिपब्लिकमधील ब्रनो शहरात इंटिरिअर डेकोरेट सामान तयार करणाऱ्या कारखान्याचे मालक आहेत. तर वर मार्सेलची आई रूडमिला या व्यवस्थापिका म्हणून काम पाहतात.
बातम्या आणखी आहेत...