आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात शोधला नॅनो पार्टिकल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नॅनो टेक्नॉलॉजीमुळे विज्ञानात क्रांती घडली. त्याच टेक्नॉलॉजीवर विद्यावाचस्पती (पीएचडी)साठी संशोधन करताना जळगावातील संशोधकास नवीन चकाकणारा पदार्थ मिळाला. या नवीन पदार्थामुळे दूरचित्रवाणीच्या पदार्थांपासून संगणकाच्या प्रिंटरच्या शाईपर्यंत गुणवत्ता सुधारणार आहे.

जळगावातील मू. जे. महाविद्यालयातील प्राध्यापक आर. आर.अत्तरदे हे पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील प्रा. डॉ. डी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करीत आहेत. अब्जांश तंत्रज्ञानावर (नॅनो टेक्नॉलाजी) आधारित पदार्थ करून वायू संवेदक तयार करणे हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. या विषयावर संशोधन करताना त्यांना अतिशय चकाकणारा नवीन पदार्थ मिळाला. राज्यातील अनेक भागात हा पदार्थ मुबलक प्रमाणावर उपलब्ध असून त्याला येणारा खर्च अत्यल्प आहे. यामुळे हा पदार्थ स्वस्तात तयार झाला आहे.

पेटंट मिळवणार
नॅनो टेक्नॉलॉजीमधील या पदार्थाचे पेटंट मिळविण्यासाठी प्रा. अत्तरदे
प्रयत्न करणार आहेत. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाला संशोधन प्रस्ताव पाठवणार आहेत. त्यासाठी त्यांनी याबाबतचा अहवाल तयार केला असून लवकरच तो सादर होईल.

यांना होणार फायदा
नॅनो टेक्नॉलाजीमधील या नवीन पदार्थामुळे दूरचित्रवाणीचा पडदा, प्रकाश नळी, चिन्ह दर्शक, संगणक प्रिंटरची शाई, वेगवेगळे आकर्षक रंग यांना फायदा होणार आहे. त्यांचा दर्जा अधिक सुधारणार आहे.