आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांची करा नार्काेटेस्ट, नगरसेवक कैलास साेनवणे यांची सभागृहात मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशेष महासभेत सभागृहात एकमेकाशी चर्चा करताना नगरसेवक. - Divya Marathi
विशेष महासभेत सभागृहात एकमेकाशी चर्चा करताना नगरसेवक.
जळगाव- हल्लाहाेण्याची शक्यता वर्तवणाऱ्या अायुक्तांच्या पत्राचे पडसाद शुक्रवारच्या महासभेत उमटले. अायुक्तांनी थेट नावांचा उल्लेख करून जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा. त्यांना ज्याने फाेन केला त्याची तसेच अायुक्त संशयितांची नार्काेटेस्ट करून सत्यता बाहेर अाणण्याची मागणी महासभेत करण्यात अाली. अपयश लपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशयही या वेळी व्यक्त करण्यात अाला.

अायुक्त संजय कापडणीस यांनी त्यांच्यासह दाेन्ही उपायुक्तांवर हल्ला हाेण्याची शक्यता असल्याचे पत्र पाेलिसाना दिले अाहे. त्यादृष्टीने अाता तपासाला गतीही अाली अाहे. गेल्या तीन दिवसांपासून नगरसेवक कर्मचाऱ्यांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने महासभेतही यावर चर्चा रंगली. सभापती ज्याेती चव्हाण यांनी अायुक्तांचा कांगावा असल्याच्या प्रतिक्रियेचे खाविअाने स्वागत केले. हा अाराेप अाता खराही वाटू लागला अाहे. अधिकाऱ्यांना धमक्या येतात, असे पत्र देणे ही सभागृहासाठी शाेकांतिका अाहे. खरच अपयश लपवून लक्ष वळवण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवालही या वेळी नितीन लढ्ढा यांनी केला. अायुक्तांच्या मनात ज्याचे नाव अाहे त्याची अायुक्तांची नार्काेटेस्ट करण्याची मागणी नगरसेवक कैलास साेनवणेंनी केली.

नावे जाहीर झालीच पाहिजे
नगरसेवकांचाअावाज दाबला जाताेय. हल्ल्याची भीती अथवा धमकी येत असेल तर त्यांची नावे जाहीर व्हायलाच हवी. जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्याची गरज असल्याचे अमर जैन यांनी सांगितले; तर प्रशासनाला जाब विचारणाऱ्यांचे ताेंड बंद करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचे कैलास साेनवणे म्हणाले. पाच काेटींची मागणी, कराची वसुली वाढवणे, प्राेसिडिंगमधील बदल अाम्हीच बाेलताे त्यामुळे सत्यता बाहेर यावी. जनतेचे लक्ष वळवण्यासाठी तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रयत्न असल्याची टीकाही करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...