आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Divya Marathi, Jalgaon

नरेंद्र मोदींच्या सभेला दोन लाखांच्या उपस्थितीचे टार्गेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या 20 रोजीच्या जाहीर सभेवर शिक्कामोर्तब झाला आहे. रविवारी दुपारी 3 वाजता होणार्‍या या सभेला जिल्हाभरातून दोन लाख लोकांच्या उपस्थितीचे टार्गेट भाजप पदाधिकार्‍यांसमोर राहणार आहे. यासाठी 6 लाख चौरस फूट जागेवर तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.


नशिराबाद रोडवरील टीव्ही टॉवरजवळील जागेत ‘भारत विजयी रॅली’चे आयोजन केले आहे. यानिमित्त 20 बाय 20 फुटाचे व्यासपीठ उभारण्यात येणार असून त्यावर 21 नेते विराजमान होतील. तसेच अन्य प्रमुख नेत्यांसाठी 20 बाय 40 फुटाचे दुसरे व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, वकील, डॉक्टर, सीए तसेच महायुतीचे पदाधिकारी यांच्यासाठी 10 हजार निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आल्या असून त्यांच्या बसण्यासाठी 10 हजार खुच्र्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाजपने जिल्ह्यातील प्रचाराचा तिसरा टप्पा पूर्ण केल्याचे सांगत खाविआने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी शहरातील भाजपचे मताधिक्य 35 हजारांपेक्षा जास्त असेल, असा दावा जिल्हाध्यक्ष वाघ यांनी केला.
गडकरी, मुंडेच्याही सभा : माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची 22 रोजी सभा होणार आहे. तसेच 18 रोजी संसदेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांची चाळीसगाव व जामनेरला तर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची 19 रोजी सभा होईल. नरेंद्र मोदी यांची थ्रीडी सभेचे चाळीसगाव येथे 17 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजन केले आहे.


धुळे येथील सभेच्या तारखेत बदल
नरेंद्र मोदी यांची 17ला शहरात होणारी सभा 22 एप्रिलला होणार आहे. यापूर्वी ही सभा बाजार समितीसमोरील मैदानावर होणार होती; परंतु त्यांच्या दौर्‍याच्या कार्यक्रमात बदल झालेला आहे. असे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर यांनी सांगितले.