आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Divya Marathi, Jalgaon

मोदींनी थ्री-डी सभेतून घातली तरूणाईला साद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - मेरे भाईयों और बहनो.. मैं अभी तामिलनाडू से आकर आपके सामने हूँ.. आज देशभर में 121 सिटोपें अच्छा मतदान हुआ है। हे शब्द कानावर पडताच समोरून ‘नमो नमो’चा गजर सुरू होतो. साक्षात नरेंद्र मोदी आपल्यासमोर उभे असल्याची जाणीव श्रोत्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील बदलत्या युगामुळे झाल्याशिवाय राहत नाही. मोदींनी यात विशेष करून देशभरातील तरुणांना साद घातली.


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची थ्रीडी सभा सॅटेलाइटद्वारे चाळीसगाव, भुसावळ, शिरपूरसह देशातील 100 ठिकाणी गुरुवारी सायंकाळी 8 वाजता झाली. गेल्या दोन दिवसांपासून या सभेविषयी प्रचंड उत्सुकता खास करून तरुण मतदारांना होती.


सोनिया गांधींवर हल्लाबोल
मोदींनी थ्रीडी सभेत सोनिया गांधी यांना लक्ष केले. इलेक्टॉनिक्स् प्रसार माध्यमात सोनिया गांधींनी दिलेल्या भाषणाचा संदर्भ घेत कॉंग्रेसने देशाची परंपरा मोडीत काढली अन् शहदाजे देशात खोटा प्रचार करून मतांसाठी हात पसरवत असल्याचा हल्लाबोल केला.


होलिओग्राफिक स्क्रीन
लक्ष्मीनगरातील सहा-सात एकरावरील प्रांगणावर ही सभा झाली. संपूर्ण प्रांगण खचाखच भरले होते. थ्रीडी सभेची यंत्रणा उभी करण्यासाठी गुजरात, आंध्र प्रदेशातून आलेले तंत्रज्ञ सकाळपासून कामाला लागले होते. जवळपास 16 फूट उंचीच्या होलिओग्राफीक स्क्रीनवर मोंदीचे भाषण सुरू असताना प्रांगणावर सारे वातावरण शांत होते.


तंत्रज्ञानाची उत्सुकता
तरुणच काय परंतु मध्यम वयातील र्शोत्यालाही थ्रीडी सभेचे आकर्षण राहिले. अशा प्रकारचे भाषण पहिल्यांदाच अनुभवास मिळाले. हे तंत्रज्ञान आपण गुजरातमधील निवडणुकीत वापरले होते. आज आपणास प्रत्यक्ष येण्याची इच्छा होती परंतु नवीन तंत्रज्ञानाने आपल्यातील हे अंतर कापले गेल्याचे मोदींनी स्पष्ट केले.


मोदी खुर्चीवर बसले अन् पाणीही प्यायले
अहमदाबादमध्ये राहून त्यांनी हे भाषण केले. सभेची वेळ सायंकाळी 7 वाजेची देण्यात आली होती. बरोबर 8 वाजता मोदी सभेच्या व्यासपीठावर आले. ‘जरा लेट पहूचा, इसलीए आपकी क्षमा चाहता हूँ। असे म्हणत त्यांनी हात उंचावले व व्यासपीठावरील खुर्चीत दोन मिनिटे बसले. पाणी प्यायल्यावर त्यांनी माईकचा ताबा घेत भाषणास सुरुवात करताच तरुणांनी मोदी..मोदी.चा नारा दिला. समोर पडदा नाही, सिनेमागृहासारखा पाठीमागून पडद्यावर चमकणारा फोकस नाही..साक्षात मोदी आपल्यासमोर उभे असल्याचा भास झाला.