आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Election Rally, BJP, Jalgaon, Divya Marathi

शहराबाहेर होईल नरेंद्र मोदींची सभा, उच्चांक मोडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे नियोजन सुरू झाले आहे. आतापर्यंतच्या सभांचा उच्चांक मोडणारी सभा होण्याची शक्यता लक्षात घेता नशिराबादरोड किंवा शिरसोली रस्त्यावरील मोकळ्या जागेचा शोध घेतला जाणार आहे. 20 एप्रिल रोजी सभा होण्याची शक्यता वर्तवली जाते.
जळगाव व रावेरमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात येणार आहे. मतदान 24 एप्रिल रोजी आहे. त्यापूर्वी म्हणजे 20 एप्रिल रोजी सभा घेण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.


अद्याप सभेची तारीख निश्चित नसली तरी त्यादृष्टीने जागेसाठी चाचपणी सुरू झाली आहे. मोदींच्या सभेसाठी शहरातील मैदानाची जागा अपूर्ण पडू शकते. त्यामुळे शहराबाहेर शिरसोली रस्त्यावर किंवा नशिराबाद रस्त्यावर सभेसाठी जागेचा शोध घेतला जाऊ शकतो.


चौधरींचा प्रवेश मोदींच्या उपस्थितीत?
भाजपात वादाचे कारण बनलेल्या भुसावळचे अनिल चौधरी यांनी भाजपा उमेदवारासाठी रावेर तालुक्यातील सावदा-फैजपूर येथे तसेच गुरुवारी जामनेर तालुक्यातही प्रचार केला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंकडूनही त्यांच्या प्रवेशाला हिरवी झेंडी दाखवली गेल्याचे वृत्त असून नरेंद्र मोदींच्या सभेत चौधरींचा प्रवेश होऊ शकतो.

बुथ प्रमुखांवर जबाबदारी निश्चित
बुथप्रमुखांनी आपापल्या बुथमध्ये सक्रिय राहून 100 मते वाढविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठय़ा नेत्यांच्या सभांमधून प्रचारावर भर दिला जाईलच परंतु गावात थांबून मतदारांशी संपर्क ठेवण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.