आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Lok Sabha Election, BJP, Divya Marathi

मोदी लाटेमुळे होणार काट्याच्या लढती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणुकीच्या निमित्ताने जातीपातीच्या राजकारणाला वेग आला आहे. भाजपाकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा झाली आहे. काँग्रेसकडून राहुल गांधींना पुढे केले जाईल असे वाटते. देशात सद्या मोदी लाट असल्याने एनडीए व युपीएमध्ये काट्याची लढत होईल, असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अण्णा डांगे यांनी पत्रकार परिषदेत मान्य केले.


लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्याकरिता डांगे सोमवारी जळगावात आले होते. ते म्हणाले की, देशात अनेक पक्ष असले तरी लढत भाजप व काँग्रेसमध्ये आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्रातील अनेक पदे सोडून कृषिमंत्री होऊन खर्‍या अर्थाने कृषिक्रांती घडविल्याचे सांगितले. राज्यात 1 कोटी 10 लाख लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यात आले परंतु सवलती सुरू करण्याची खरी मागणी आहे. यासंदर्भात पवार धाडसी निर्णय घेऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. धनगर समाज संघटित होत नाही. मेंढरं राखणारा आमचा समाज मेंढरासारखाच राहील. त्यांना बाबासाहेबांचे नेतृत्व मिळायला हवे होते. धनगर समाजाला न्याय मिळण्यासाठी गतकाळात केलेल्या आंदोलनांची माहितीही त्यांनी दिली. परंतु गेल्या दहा वर्षांपासून आघाडीचे सरकार असूनही न्याय न मिळाल्याची खंत व्यक्त केली. परंतु आचारसंहिता संपल्यानंतर धनगर समाजाला आदिवासींमध्ये गणले जाण्याची घोषणा होईल, असा विश्वासही व्यक्त केला.