आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Political Style Icon, Divya Marathi

‘पॉलिटिकल स्टाइल आयकॉन’मध्ये मोदी, खेर विजयी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आयएनआयएफडीतर्फे ‘पॉलिटिकल स्टाइल आयकॉन’ निवडणुक झाली. त्यात नरेंद्र मोदी आणि किरण खेर विजयी झाल्याची माहिती संचालिका संगीता पाटील यांनी दिली.संस्थेच्या 180 शाखांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘बेस्ट ड्रेस पॉलिटिशियन’ अशी निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात भारतातील अनेक राजकारण्यांची नावे देण्यात आली होती. या निवडणुकीत पुरुष गटात नरेंद्र मोदी हे 3,072 मते मिळवून विजयी झाले.

तसेच राहुल गांधी (322), राजीव प्रताप रुडी (293), शशी थरूर (168), अरविंद केजरीवाल (102) व अखिलेश यादव (68) यांना मते मिळाली. त्याचप्रमाणे महिला गटात किरण खेर या 2,281 मतांनी विजयी झाल्या. वसुंधराराजे सिंधिया (592), सोनिया गांधी (533), जयललिता (305), प्रिया दत्त (219) व वृंदा करात (105) यांना मते मिळाली. निवडणुकांमध्ये बहुधा जात, धर्म, पक्ष आणि ताकद पाहून मतदान केले जाते. कार्यक्रमासाठी प्रा.भावना गायधने, प्रा.शिवानी गांधी, प्रा.सेदुलक्ष्मी मलबारी, प्रा.मयूरी बोहरे, प्रा.मनाली शिंपी, उज्ज्वला पाटील, पानेरी ठाकूर आदींचे सहकार्य मिळाले.