आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Bhusawal Surat Railway Track

गेटमनच्या सतर्कतेने टळला अनर्थ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भुसावळ-सुरत रेल्वे मार्गावर दुध संघाजवळील गेटजवळ सकाळी 8.30 वाजता मालगाडी जात असताना रूळ तुटल्याचे गेटमन नंदकुमार गायके यांच्या लक्षात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. गायकेंच्या दक्षतेमुळे गाडी थांबविण्यात येऊन मोठा अपघात टळला.


गाड्या वेळेवरच
दुरुस्ती विभागाचे पथक वीस मिनिटात घटनास्थळी आले. त्यांनी तत्काळ काम सुरू केले. पथकाने दहा मिनिटात रूळाला तात्पुरता जोड देऊन गाड्या पास केल्या. रेल्वेमार्ग निरीक्षक कैसर अली यांच्या 16 जणांच्या पथकाने हे अवघड काम अगदी सहज केले.


रूळ कमकुवत
रूळ हे जॉइंटजवळ कमकुवत असतात. त्यामुळे जॉइंटजवळ अनेकवेळा तुटतात. मात्र, आम्ही नेहमी लक्ष ठेवत असतो, त्यामुळे हे प्रमाण खूपच कमी आहे. कैसर अली, रेल्वेमार्ग निरीक्षक.


गायकेंनी टाळला चौथा अपघात
गेटमन नंदकुमार गायके यांनी त्यांच्या 34 वर्षाच्या रेल्वेसेवेत चौथ्यांदा दुर्घटना होण्यापासून वाचविले. यापूर्वी तीन वेळा हॉट एक्सलला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अपघात टाळले. त्यांना रेल्वे प्रशासनाने 1995 मध्ये अपघातविरहित सेवेसाठी, 2006 आणि 2013 मध्ये डीआरएमतर्फे उत्कृष्ट कामगार पुरस्कार दिले आहेत.


अशी घडली घटना
रेल्वे मालगाडी सुरतकडून जळगावच्या दिशेने येत होती. 8.40 वाजता दूध संघाजवळ असलेल्या रेल्वेगेट जवळून जात असताना अचानक मोठय़ाने आवाज आला. गेटमन गायके तत्काळ बाहेर आले. त्यांना पोल क्रमांक 12 आणि 13 च्या दरम्यान रूळ तुटला असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित स्थानक व्यवस्थापकांना यासंदर्भात सूचना दिली आणि त्वरित रेल्वेच्या दिशेने पळाले आणि गार्डला लाल झेंडा दाखवून रेल्वे थांबविण्याची सूचना केली. गार्ड प्रेशरने अध्र्या मिनिटात गाडी थांबविली. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही.


पाच इंचाचा तुकडा
मालगाडी जात असताना रूळाचा पाच इंचाचा तुकडा पडला. ट्रॅक एक्सचेंज करीत असताना गेटमनला आवाज आला. त्यानंतर गाडी थांबविल्यानंतर ही बाब लक्षात आली. गेटमनने सूचना दिल्यानंतर लगेच स्थानक व्यवस्थापक ए.एस.कुलकर्णी यांनी तत्काळ पथक पाठविले. वीस मिनिटात सर्व कर्मचारी घटनास्थळावर पोहचले. त्यांनी दहा मिनिटात तात्पुरता रूळ जोडून गाड्या जाण्यासाठी सोय करून दिली. त्याकाळात नवजीवन एक्स्प्रेसची वेळ होती. एवढी मोठी घटना घडूनही त्या गाडीला केवळ पाच ते सात मिनिटे उशीर झाला. घटनास्थळाला व्यवस्थापक कुलकर्णी यांनी भेट दिली.