आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या विद्यार्थिनीवर धुळ्यात बलात्कार; वेश्या व्यवसाय करण्यासही केले प्रवृत्त!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- नाशिकच्या शालेय विद्यार्थिनीला कुंटणखान्यात डांबून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. प्रतिकार केला असता तिला वेळोवेळी मारहाणही करण्यात आली. संधी मिळताच कुंटणखाण्यातून पलायन केलेल्या पीडित मुलीच्या तक्रारीवरून मंगळवारी नऊ जणांविरुद्ध अपहरण, बलात्कार, दमदाटी आणि वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बेबीबाई चौधरी या महिलेला अटक करण्यात आली आहे.

नाशिकच्या उत्तमनगर वसाहतीत राहणारी नववीची विद्यार्थिनी बेपत्ता झाली होती. या मुलीला धुळ्याजवळील नगाव शिवारात असलेल्या बेबीबाई ऊर्फ विठाबाई संतोष चौधरी हिच्या घरात ठेवून तिच्यावर बलात्कार केला. मारहाणही करण्यात आली. अडीच महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. सोमवारी सायंकाळी पीडित मुलीने कुंटणखान्यातून पळ काढला. भेदरलेल्या अवस्थेत ती दोंडाईचाकडे गेली. तेथील पोलिसांनी तिला मंगळवारी पहाटे धुळ्यात आणले.

पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बेबीबाई ऊर्फ विठाबाई चौधरी, तिचा मुलगा गणेश संतोष चौधरी (दोघे रा. नगाव शिवार), सपना ऊर्फ प्रणिता पाटील (रा. नाशिक), विजूभाऊ, नवतेज बाजारचा मालक, सोनगीर येथील संजय बोरसे, धुळ्यातील फरहान, नरडाणा येथील अशोक, साक्री येथील अनिल पवार यांनी मला नाशिकमधून पळवून आले. नगाव शिवारातील एका कुंटणखाण्यात डांबून माझ्यावर अत्याचार केले. विरोध केल्यानंतर मारहाणही करण्यात आली. दरम्यान, इतर आरोपी मात्र फरार आहेत, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.