आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nathabhau See 'o Tuni My' Film In Ahirani Language At Jalgaon

‘अाे तुनी माय...’ पिच्चर नाथाभाऊले अावडना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - स्थानिक अहिराणी भाषेत करमणुकीसाेबतच सामाजिक प्रश्नांवर प्रबाेधन करणारा ‘अाे तुनी माय’ हा चित्रपट महसूलमंत्री एकनाथ खडसेंना भावला. प्रादेशिक भाषेचीही उपभाषा असलेल्या अहिराणीत चित्रपट काढलेल्या निर्माता अािण दिग्दर्शकांनी केवळ लाभ डाेळ्यासमाेर ठेवता सामाजिक प्रबाेधनासाठी धारिष्ट दाखविल्याबद्दल शाबासकीची थाप देत चित्रपट टॅक्स -फ्री करण्याची घाेषणा महसूलमंत्र्यांनी केली. विशेष म्हणजे व्यस्त दिनचर्येतही त्यांनी संपूर्ण ताफ्यासह पाऊणे दाेन तास मध्यंतरापर्यंत चित्रपट पाहिला.
अहिराणी भाषेतील ‘अाे तुनी माय’ हा चित्रपट शनविारी नटवर मल्टिप्लेक्समध्ये दाखविण्यात अाला. दुपारी १२ वाजेच्या शाे ला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची विशेष उपस्थिती हाेती. अामदार सुरेश भाेळे, डाॅ.गुरूमुख जगवाणी,जिल्‍हाधिकारी रूबल अग्रवाल, पाेलिस अधीक्षक डाॅ.जे.डी. सुपेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित हाेते.

महसूलमंत्र्यांनी काढली सगळ्यांची तिकटिे
कार्यकर्तेअन् प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी प्रथम तिकीट खिडकीवरून सगळ्या कार्यकर्त्यांची तिकटिे खरेदी केली, त्यानंतरच त्यांनी थिएटरमध्ये पाऊल ठेवले.
चित्रपट भावला
प्रादेशिकभाषेचीही उपभाषा असलेल्या अहिराणीतील चित्रपट निर्मितीचे धारिष्ट काेैतुकास पात्र अाहे. सामाजिक उपक्रम, समाज जागृती, शासकीय याेजनांबाबतची माहिती, सावकारीला प्रतिबंध, हगणदारीमुक्ती, गावातील गुंडागर्दीच्या दहशतीविराेधातील लढा अादी मुद्यांवर प्रकाश टाकला अाहे. चित्रपट मला भावला. विदेशातही हा चित्रपट जाण्यासाठी त्यात काही सुधारणा करण्याची गरज अाहे. चित्रपट टॅक्स-फ्री करेल, अात्ताच तशी घाेषणा करण्यास हरकत नाही. एकनाथखडसे, महसूलमंत्री
अहिराणी गाेड भाषा
अहिराणीही गाेड भाषा अाहे. भाषेत मायेचा अाेलावा वाटताे. विधानसभेत मी अनेक वेळा अहिराणी भाषेचा वापर करताे. एकदा मी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना संपूर्ण राज्य जळत असताना तुम्ही मात्र शांत बसून अाहात हे सांगण्यासाठी ‘गाव बये अन् हनुमान बेंबी चाेय’ ही म्हण वापरली हाेती. अहिराणी भाषेत तयार केलेला चित्रपट इतर भाषेतही कळला पाहिजे म्हणून त्या खाली मराठी, हिंदी अािण इंग्रजी भाषेतील अनुवाद किंवा चित्रण केले पाहिजे, असे मत महसूलमंत्री खडसे यांनी व्यक्त केले.